WhatsApp New Feature : WhatsApp वर गर्लफ्रेंडशी पर्सनल चॅटिंग करताय? चॅटबॉक्स असं करता येईल लॉक

WhatsApp ने आता आपल्या यूजर्ससाठी एक नवीन WhatsApp Chat Lock फिचर जारी केलंय.
WhatsApp New Feature
WhatsApp New Featuresakal

WhatsApp New Feature : इंस्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp वर्ल्डवाइड खूपच पॉप्यूलर आहे. कंपनी नवनवीन फिचर्स यूजर्ससाठी आणत असते. कंपनीने नुकतेच एक व्हॉट्सॲप चार फोनमध्ये चालवण्याचे फिचर रोलआउट केले आहे.

आता कंपनी यूजर्ससाठी आणखी एक नवीन फिचर घेऊन आलेली आहे. WhatsApp ने आता आपल्या यूजर्ससाठी एक नवीन WhatsApp Chat Lock फिचर जारी केलंय. मात्र हे फिचर सर्व यूजर्ससाठी सध्या उपलब्ध करण्यात आलेले नाही. मात्र व्हॉट्सॲपचे हे फिचर खूपच भारी आहे. (WhatsApp Chat Lock New Feature new WhatsApp update )

WhatsApp New Feature
WhatsApp Chat Recover Tricks : सर्वात सोपी पद्धत; या स्टेप्स वापरून WhatsApp चॅट असं करा रिकव्हर!

व्हॉट्सॲप डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी साइट WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, आता चॅट लॉक फिचरला बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचरला आणल्यानंतर सर्वात मोठा फायदा हा असेल की, तुम्हाला व्हॉट्सॲपला लॉक करण्याची गरज राहणार नाही.

तुम्ही फक्त पर्सनल चॅटलाही लॉक लावू शकाल. याचाच अर्थ असा होतो की, जर तुम्ही कोणत्याही एका चॅटला हाइड करण्यासाठी चॅटला अर्काइव करत असाल तर व्हॉट्सॲपला लॉक करावे लागायचे मात्र आता असं करण्याची गरज नाही कारण तुम्ही आपल्या कोणत्याही खास व्यक्तीच्या पर्सनल चॅटला लॉक लावू शकाल.

WhatsApp New Feature
WhatsApp Trick : WhatsApp ची ही ट्रीक तुम्हाला माहितेय का? डिलीट झालेले मेसेजही पुन्हा वाचणं शक्य

हे फिचर कसं काम करतं?

  • WhatsApp Chat Lock फिचरला एनॅबल करताना...

  • सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला स्क्रॉल करण्यानंतर खाली चॅट लॉक ऑप्शन दिसेल.

  • तुम्हाला या ऑप्शनवर टॅप करावे लागेल.

  • यानंतर तुम्ही लॉक धीस चॅट वित फिंगरप्रिंट ऑप्शनला एनॅबल करा.

  • तुम्ही या ऑप्शनला एनॅबल कराल त्याचवेळी तुमची पर्सनल चॅट लॉक होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com