व्हॉट्सअॅप घेतंय तुमच्या डोळ्यांची काळजी; नव्या फीचरबद्दल जाणून घ्या!

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 डिसेंबर 2019

गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅप डिलीट मेसेज फिचरची झलक पाहायला मिळाली होती. यूजर्सला आलेले मेसेज एका ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होण्याची सुविधा या फिचरमुळे शक्य झाली

सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअॅप ओळखले जाते. ग्राहक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत आपल्या व्हर्जनमध्ये विविध बदल करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अँड्रॉईड आणि आयफोन अॅपसाठीच्या डार्क मोडवर काम सुरू केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आता व्हॉट्सअॅपने अँड्रॉईडच्या बीटा व्हर्जनमध्ये अनेक बदल केले आहेत. या व्हर्जनमध्ये प्लेसहोल्डर हा ऑप्शन समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक डेमो नुकताच प्रकाशित करण्यात आला. या फोटोमध्ये व्हीओआयपी स्क्रीन दाखविण्यात आली आहे. मात्र, ही सेवा अजूनही सुरू झाली नसल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. 

No photo description available.

- फेसबुक, ट्विटरला तगडी टक्कर; ‘डब्लूटी’ सोशल मीडियातला नवा भिडू

या नव्या व्हर्जनमध्ये प्रोफाईल, प्लेस होल्डर चिन्ह हे राखाडी रंगात दिसत आहे. त्यासाठी यूजर्सना डार्क मोड ऑन करावा लागणार आहे. सध्या यूजर्स जे व्हॉट्सअॅप व्हर्जन वापरत आहेत, त्यामध्ये व्हीओआयपी स्क्रीन हिरव्या रंगात दिसत आहे. त्याचा यूजर्सच्या डोळ्यावर ताण येत असल्याचे एका पाहणी अहवालात म्हटले आहे.

No photo description available.

- सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

मात्र, नव्या बीटा व्हर्जनमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. जेणेकरून यूजर्स रात्री अंधारातही व्हॉट्सअॅपचा वापर करत असेल, तरी त्याच्या डोळ्यांना कोणताही त्रास होणार नाही. 

No photo description available.

- मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा

अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅप डिलीट मेसेज फिचरची झलक पाहायला मिळाली होती. यूजर्सला आलेले मेसेज एका ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होण्याची सुविधा या फिचरमुळे शक्य झाली आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Dark Mode Elements Spotted in Avatar Images