WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार स्क्रीन शेअर, नवीन फीचरची चाचणी सुरू | WhatsApp is testing new screen sharing feature in beta version for android | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार स्क्रीन शेअर, नवीन फीचरची चाचणी सुरू

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स सध्या लाँच करत आहेत. यूजर्सना एकाच अ‍ॅपवर बऱ्याच गोष्टी करता याव्यात यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच आता व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल सुरू असताना स्क्रीन शेअर करण्याची सुविधाही लवकरच देण्यात येणार आहे. सध्या बीटा व्हर्जनवर याची चाचणी सुरू आहे.

गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम, स्काईप अशा प्रकारच्या अ‍ॅप्सवर तुम्ही स्क्रीन शेअरिंगची सुविधा पाहिली असेल. मुख्यतः आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारी गोष्ट समोरच्या व्यक्तीला किंवा टीमला दाखवण्यासाठी या फीचरचा वापर करण्यात येतो. आता हीच सुविधा व्हॉट्सअपवरही उपलब्ध होणार आहे.

WABetaInfo या फीचर ट्रॅकर वेबसाईटने याबाबतची माहिती दिली. व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईड बीटा 2.23.11.19 या व्हर्जनमध्ये हे फीचर दिसून आलं आहे. हे फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड अँड्रॉईड रेकॉर्डिंग/कास्टिंगची परवानगी व्हॉट्सअ‍ॅपला द्यावी लागणार आहे. यानंतर केवळ एका टॅपमध्ये तुम्ही आपली स्क्रीन समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.

असं काम करेल फीचर

स्क्रीन शेअरिंगचा पर्याय सिलेक्ट करून 'स्टार्ट नाऊ' बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगलची एक वॉर्निंग मिळेल. यानंतर तुम्ही स्क्रीनवरील कंटेंट समोरच्या व्यक्तीला दाखवू शकाल. तुमचं काम झाल्यानंतर स्क्रीन शेअरिंग बंद करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करावं लागेल.

काय होईल फायदा

तुम्हाला अचानक ऑफिसचं काही काम करायचं असेल, आपल्या मोबाईलमधील गॅलरी, व्हिडिओ, पीपीटी असं काही दुसऱ्या व्यक्तीला दाखवायचं असेल तर तुम्ही ते व्हॉट्सअ‍ॅपवरूनच करू शकाल. तसंच, एखाद्या व्यक्तीला स्मार्टफोन वापरण्यासाठी मदत करायची असेल, तर अशा वेळी देखील तुम्हाला या फीचरचा फायदा होईल.

टॅग्स :Technologywhatsapp