एकच WhatsApp अनेक डिव्हाइसवर; येतंय नवं Logout फीचर

whatsapp feature
whatsapp feature

नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅप सातत्याने काही ना काही अपडेट देत असते. गेल्या महिन्यात प्रायव्हसी पॉलिसीवरून कंपनीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता नव्या अपडेटमध्ये युजर्ससाठी महत्त्वाचे फीचर मिळणार आहे. फेसबुक, ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया साइटवर असलेलं अकाउंट लॉगआऊटचा पर्याय देतं. तसंच आता येत्या काही दिवसात व्हॉटसअ‍ॅपही पर्याय देण्याची शक्यता आहे. यासाठी अपडेटची चाचणी सुरु आहे. हे फीचर अपडेट झाल्यानंतर युजर्स त्यांचे अकाउंट डायरेक्ट लॉगआऊट करू शकतील. 

Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, आयओएस युजर्ससाठी व्हॉटसअ‍ॅपचं नवीन बीटा व्हर्जन 2.21.30.16 आलं आहे. यामध्ये लॉगआऊट फीचर दिलं आहे. तसंच मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरही यामध्ये असण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सना वेगवेगळ्या डिव्हाइसवरून व्हॉटसअ‍ॅप अकाउंट लॉगआऊट करता येईल. 

व्हॉटसअ‍ॅपचं नवीन लॉगआऊट फीचर व्हॉटसअ‍ॅप मेसेंजर आणि व्हॉटसअ‍ॅप बिझनेस व्हर्जनमध्ये देण्यात येईल. अ‍ॅपल आणि अँड्रॉइड युजर्सना हे फीचर्स मिळेल. सध्या बीटा व्हर्जनसाठी हे फीचर लाँच केलं असून टेस्ट केली जात आहे. या फीचरमुळे सतत व्हॉटसअ‍ॅप वापरण्याच्या सवयीतही बदल होईल.

युजर्स या फीचरमुळे चार स्मार्टफोनमध्ये एकच अकाउंट वापरू शकतील. तसंच यासाठी प्रायमरी डिव्हाइसमध्ये अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असण्याची गरज नसेल. लॉगआऊट फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही डिव्हाइसवरचे अकाउंट लॉग आऊट करू शकतील.

नवं फीचर आल्यानंतर मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरसाठी युजर्सना जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. सध्या सर्वसामान्य युजर्ससाठी व्हॉटसअ‍ॅपने फक्त वेब व्हर्जनमध्ये लॉग आऊट फीचर दिलं आहे. वेब व्हॉटसअ‍ॅपवर लॉग इन करण्यासाठी https://web.whatsapp.com/ वर जाऊन स्मार्टफोनवरून क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. लॉगइन झाल्यानंतर लॉगआऊट करण्यासाठीही पर्याय दिला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com