Whatsapp Feature : नवं फिचर कमालीचं, व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसह आता असा फोटो फॉरवर्ड करता येईल l whatsapp new feature you can forward photo with caption know easy steps | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp Feature

Whatsapp Feature : नवं फिचर कमालीचं, व्हॉट्सअ‍ॅपवर कॅप्शनसह आता असा फोटो फॉरवर्ड करता येईल

Whatsapp Feature : रोज सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी भारतात व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरले जाते. इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर यूजर्सची सोय आणि यूजर्सचा इंटरफेस सुधारण्यासाठी सतत नवनवीन फिचर्स जारी केले जात आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने कॅप्शनसह फोटो फॉरवर्ड करण्यासाठी एक अप्रतिम फीचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही फोटो शेअर करताना कॅप्शन टाकू शकता. तुम्हालाही व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या वापराविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर कसे वापराल?

Android आणि iOS वर WhatsApp ला नवीन अपडेट प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे ज्यात दोन नव्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. १) कॅप्शनसह फोटो फॉरवर्ड करण्याची क्षमता आणि २) पोलमध्ये सुधारणा. हे अपडेट आता यूजर्ससाठी Google Play Store आणि Apple App Store द्वारे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला ते वापरायचे असल्यास, तुम्ही प्रथम तुमचे अॅप अपडेट केले पाहिजे. हे फिचर नवीन असून हळूहळू रोलआऊट होत असल्याने सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

Whatsapp Feature

Whatsapp Feature

कॅप्शनसह फोटो कसा फॉरवर्ड कराल?

Update केल्यानंतर कॅप्शन फॉरवर्ड फिचरसह फोटो पाठवायचे असल्यास, या स्टेप्स फॉलो करा.

तुमच्या स्मार्टफोनवर अपडेटेड व्हॉट्सअॅप उघडा.

आता पर्सनल चॅट किंवा ग्रुप चट उघडा जिथे तुम्हाला कॅप्शनसह एखादा फोटो प्राप्त झाला असेल.

फोटो सिलेक्ट करण्यासाठी त्याला लाँग प्रेस करा आणि सगळ्यात वर फॉरवर्ड बटनवर टॅप करा.

दुसऱ्या पेजवर फोटो सिलेक्ट आणि शेअरसाठी कान्टॅक्ट डिटेल्स दिसेल. सगळ्यात खाली फोटो आणि कॅप्शनसह एक नवीन सेक्शन तुम्हाला दिसेल. (Technology)

फोटोला कॅप्शनसोबत शेअर करण्यासाठी सेंड बटनवर टॅप करा. जर तुम्हाला कॅप्शन शेअर करायचे नसेल तर टॉप राइट आणि X बटणवर क्लिक करा.

ही सुविधा यूजर्सना X आयकॉनवर टॅप करून कॅप्शन अॅड करण्याची स्वीकृती देते.

टॅग्स :Technologywhatsappphoto