WhatsAppचे मॅसेज Forward करताना येणार मर्यादा! नवे अपडेट जाणून घ्या

आधी पाच लोकांना मॅसेज फॉरवर्ड करता यायचे.
whatsapp forwading message update
whatsapp forwading message update sakal

व्हॉट्सअप लोकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप वरून एकावेळी अनेकांना फोटो, व्हिडिओ, GIFs पाठवले जातात. पण त्यासाठी एकाच वेळी पाच लोकांना मॅसेज फॉरवर्ड करता येत होते. पण नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन मर्यादा आणली आहे. WABetaInfo ने ट्विटरवर याविषयी माहिती दिली असून Whatsapp मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवी लिमिट असल्याचे त्यात सांगितले आहे.

whatsapp forwading message update
Holi Bank Holiday : या आठवड्यात बॅंकाना चार दिवस सुट्टी! कामं लवकर पूर्ण करा

WhatsApp फॉरवर्डिंग मॅसेज फीचरच्या माध्यमातून युझर्सना एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये मॅसेज पाठवता येतात. तुम्ही पाठवलेल्या मॅसेजला '‘Forwarded’ असे लेबल लावले जाते. त्यामुळे हा दुसऱ्या कोणाचा तरी मॅसेज आहे असे लोकांना कळते. जेव्हा मॅसेज पाचपेक्षा जास्त वेळा फॉरवर्ड केला जातो, तेव्हा अशा मेसेजवर त्यावर 'Forwaded many times' असे दोन अॅरो असतात.

whatsapp forwading message update
Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा
whatsapp fwd
whatsapp fwd esakal

नवे अपडेट असे आहे!

ताज्या माहितीनुसार, आता जेव्हा मॅसेज फॉरवर्डेड म्हणून चिन्हांकित किंवा मार्क केला जातो, तेव्हा त्या मॅसेजला एकापेक्षा जास्त चॅट किंवा ग्रुपवर पाठवता येऊ शकत नाही. जर तुम्हाला हे करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा संपूर्ण मॅसेज निवडावा लागेल. नंतर तो दुसर्‍या चॅट किंवा ग्रुपवर पाठवावा लागेल.अनेक युझर्सना या नव्या मर्यादेमुळे त्रास होऊ शकतो. पण हे करण्यामागे सुरक्षितता आणि खोट्या बातम्यांना प्रतिबंध घालणे असा उद्देश आहे. याशिवाय WhatsApp चॅट लिस्ट सेक्शनच्या end-to-end इंडिकेटरवर काम करत आहे. त्याचे अपडेट्सही लवकरच मिळतील.

whatsapp forwading message update
आशिष शेलारांनी भाषणात उल्लेख केलेला तुषार प्रिती देशमुख कोण आहे ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com