WhatsApp Tips : तुमचं व्हॉट्सअॅप कोणी चोरून पाहतंय का? चुकूनही करू नका या 2 गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Tips

WhatsApp Tips : तुमचं व्हॉट्सअॅप कोणी चोरून पाहतंय का? चुकूनही करू नका या 2 गोष्टी

WhatsApp Tips : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. होय... तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे व्हॉट्सअॅप चॅट इतरही लोक वाचू शकतात. पण ते कसं?

1. थर्ड पार्टी अॅप्स

तुम्ही व्हॉट्सअॅपसाठी कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरता का? जर तुम्ही ते वापरत असाल तर ते अॅप वापरणं ताबडतोब बंद करा. कारण थर्ड पार्टी अॅप्स तुमचा पर्सनल डेटा लीक करू शकतात. डेटा लीक झाल्यानंतर तुमचा डेटा चुकीच्या कामासाठी वापरला जाऊ शकतो.

स्टिकर्स, कीबोर्ड किंवा इमोजी यांसारख्या गोष्टींसाठी लोक या थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. हे अॅप तुमचा डेटा चोरतात, त्यामुळे कंपनीचे अधिकृत अॅपच वापरा आणि थर्ड पार्टी अॅप्स वापरणे टाळा.

2. वेब WhatsApp चेक करा

व्हॉट्सअॅपमध्ये युजर्ससाठी लिंक्ड डिव्हाईस नावाचे एक फीचर आहे, या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू करू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी मोबाईल आणि कॉम्प्युटर/लॅपटॉपवर WhatsApp वापरू शकता. पण जर समजा तुमच्या नकळत कोणीतरी तुमचं WhatsApp वापरत असेल तर?

अशा परिस्थितीत, मोबाइल फोनमध्ये व्हॉट्स अॅप उघडा, उजव्या बाजूला दिसणार्‍या तीन डॉट्स मेनूवर क्लिक करून लिंक केलेल्या डिव्हाइसवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप कुठे आहे सुरू आहे ते दिसेल.

जर तुमचे अकाउंट तुमच्या संमतीशिवाय अनेक ठिकाणी उघडले असेल, तर तुम्ही तुमच्या फोनवरूनच सर्व डिव्हाइसेसवरून लॉग आऊट करू शकता. लॉग आउट करण्यासाठी, तुम्हाला ज्या डिव्हाइसवरून लॉग आउट करायचे आहे त्यावर टॅप करावे लागेल, लॉग आउटचा पर्याय आपोआप दिसेल.