WhatsApp Tips : WhatsApp वर दुसऱ्याच कोणासोबत बिझी आहे तुमचा पार्टनर ? असा करा सिक्रेट चॅटिंगचा पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Tips

WhatsApp Tips : WhatsApp वर दुसऱ्याच कोणासोबत बिझी आहे तुमचा पार्टनर ? असा करा सिक्रेट चॅटिंगचा पोलखोल

WhatsApp Tips : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. केवळ चॅटसाठीच नाही तर महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. याशिवाय WhatsApp च्या माध्यमातून कॉलिंग देखील करणे शक्य आहे. आपल्या शानदार फीचर्समुळे इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत WhatsApp ला सर्वाधिक पसंती दिली जाते. मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील व्यक्तींशी बोलण्यासाठी देखील आपण WhatsApp चा वापर करतो.

WhatsApp मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव दुप्पट होता. मात्र, यातील बऱ्याच फीचर्सबद्दल अनेकांना माहिती नाही. अशाच एका फीचरद्वारे तुम्ही तुमचा पार्टनर WhatsApp वर कोणाशी सर्वाधिक बोलत आहे, हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला पार्टनरच्या फोनचा पासवर्ड माहिती असल्यास तुम्ही हे सहज जाणून घेऊ शकता.

WhatsApp वर आपण अनेक ग्रुप्समध्ये सहभागी असतो, मित्र, कुटुंब, ऑफिस, शाळेंच्या मित्रांचा वेगळा ग्रुप अशा अनेक ग्रुप्समध्ये आपल्याला अ‍ॅड केलेले असते. याशिवाय मित्रांसोबत आपण पर्सनल चॅट देखील करत असतो. त्यामुळे अ‍ॅपवर कोणाशी सर्वाधिक बोलत आहोत, हे लक्षात येत नाही. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या फोनचा पासवर्ड माहिती असल्यास त्वरित हे तपासू शकता. बहुतांशजणांच्या WhatsApp अकाउंटला पासवर्ड नसतो, त्यामुळे तुमचा पार्टनर कोणाशी सर्वाधिक चॅट करत आहे, हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.

या स्टेप्स फॉलो करा...

-सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.

- स्क्रीनच्या बाजूच्या कोपऱ्यात दिसणार्‍या तीन डॉट्सवर क्लिक करा

- सेटिंग्स टॅब मध्ये जा.

- तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील.

- यातल्या डेटा अँड स्टोरेज मध्ये जा.

- या स्टोरेज यूसेज वर टॅप करा.

- या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅटची एक लिस्ट दिसेल.

- लिस्ट मध्ये सर्वात जास्त स्टोरेज घेणाऱ्या कॉन्टॅक्ट सर्वात वर दिसेल.

- शेयर करण्यात आलेले चॅट आणि मीडिया फाइल्सची माहितीसाठी कॉन्टॅक्ट वर टॅप करा.