व्हॉट्स अॅपचे कॉल रेकॉर्ड होत नाहीत? मग या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स नक्कीच जाणून घ्या

व्हॉट्स अॅपचे कॉल रेकॉर्ड होत नाहीत? मग या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स नक्कीच जाणून घ्या

 आजच्या काळात संपर्क साधण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे व्हॉट्स अॅप. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेली व्यक्ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवार, आप्तेष्ट यांच्या संपर्कात राहू शकते. विशेष म्हणजे काळाची आणि वापरकर्त्यांची गरज लक्षात घेता व्हॉट्स अॅपमध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहेत. यामध्येच आता मेसेजबरोबर व्हिडीओ कॉल किंवा व्हॉइस कॉल करण्याची सुविधादेखील व्हॉट्स अॅपने दिली आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर येणारे कॉल रेकॉर्ड करता येत नसल्याची तक्रार कायम वापरकर्त्यांकडून करण्यात येते. परंतु, काही युक्त्या वापरल्यानंतर ही समस्यादेखील दूर होऊ शकते. विशेष म्हणजे थोडीशी शक्कल लढवली तर व्हॉट्सअॅपचे कॉलदेखील रेकॉर्ड करता येऊ शकतात. त्यामुळेच व्हॉट्स अॅप कॉल कसे रेकॉर्ड करायचे ते पाहुयात. २००९ मध्ये व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या सेवेसाठी दाखल झालं आणि पाहता पाहता लोकप्रिय झालं. या मेसेजिंग अॅपमध्ये अनेक नानाविध फिचर्स असून त्यातील व्हिडीओ कॉल आणि व्हॉइस कॉल हे वापरकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळेच हे व्हॉइस कॉल नेमके कसे रेकॉर्ड करायचे ते जाणून घेऊयात.

व्हॉट्सअॅपवरील कॉल रेकॉर्ड करण्यासाठी प्रथम cube call recorder अॅप डाऊनलोड करा. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यातून व्हॉट्स अॅपवर जा. त्यानंतर ज्या व्यक्तीशी संपर्क साधायचा आहे त्यांनी व्हॉट्स अॅप कॉल करा. फोन केल्यानंतर क्यूब कॉल विजेट असल्याचं दाखवल्यास तुमचा फोन रेकॉर्ड होण्यास सुरुवात होते. जर तुमच्या फोनमध्ये error येत असेल तर अॅप ओपन करुन सेटिंगमध्ये जा आणि व्हॉइस कॉलमध्ये force voip वर क्लिक करा.

आयफोनमध्ये अशा पद्धतीने करा कॉल रेकॉर्ड
आयफोन युजर्स Mac च्या मदतीने व्हॉट्स अॅप कॉल रेकॉर्ड करु शकतात. यासाठी आयफोनला लाइटनिंग केबलच्या मदतीने Mac ला कनेक्ट करा. त्यानंतर मोबाईलवर trust this computer वर क्लिक करा. जर पहिल्यांदाच मॅक आणि फोन कनेक्ट करत असाल तर quick time वर जा आणि फाइल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर क्विक टाइम रेकॉर्डवर जा.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com