
Stay Safe With WhatsApp : व्हॉट्सअॅपचे हे फिचर्स समजून घ्या अन् व्हॉट्सअॅप प्रायव्हसी जपा
Stay Safe With WhatsApp : डिजीटल सेफ्टी आणखी बळकट करण्यासाठी व्हॉट्सअॅपसह सुरक्षित राहा अशी सुरक्षा मोहिम व्हॉट्सअॅपने सुरु केली आहे. लोकांना त्यांच्या सेफ्टी टूल्सबाबत आणि प्रोडक्ट फिचरबाबत जागृक करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली आहे.
यूजर्सची सुरक्षा हे व्हॉट्सअॅपचं मुख्य उद्देश्य असल्याने, या मोहिमेच्या माध्यमातून यूजर्सना प्रोडक्ट फिचरबाबत शिक्षण देणे आणि त्यांना आनलाइन घोटाळे आणि फसवणूक करणाऱ्या धोक्यांपासून सुरक्षा प्रदान करते. तसेच तुमचे व्हॉट्सअॅप सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरक्षित ठेवावे लागेल. टू स्टेप व्हेरिफिकेशन करून तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरक्षित करू शकता.
यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅप खात्याला अतिरिक्त सुरक्षा पातळीची जोड मिळते. टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी सहा आकड्यांचा पिन रिसेट आणि व्हेरिफाय करावा लागतो. हा पिन कधीही कोणाशी शेअर करू नका. जर कधी तुम्हाला रिसेट यूअर पिन फॉर टू स्टेप व्हेरिफिकेशन रिक्वेस्टचा मेल आला असेल पण तुम्ही रिक्वेस्ट केली नसेल तर कृपया त्या लिंकवर क्लिक करू नका.
तुमच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये आणि ग्रुप इनवायटिंग सिस्टिममध्ये तुम्ही कोणाला तुमचा सीन दाखवताय, व्हॉट्सअॅप ग्रुपवर तुम्हाला अॅड व्हायचे नसल्यास तुम्ही सीक्रेटली तो व्हॉट्सअॅप ग्रुप एक्झिट करू शकता. शिवाय याबाबतचं नोटिफिकेशनसुद्धा ग्रुपमध्ये पडणार नाही. (Security)
तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट कुठल्या डिवायसेसशी लिंक्ड आहे हेसुद्धा सतत चेक करत राहा. जर तुम्ही आयडेंटिफाय करण्यास असमर्थ असल्यास लगेच लॉग आऊट करा. तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट कोणीतरी यूज करत असल्याचे तुम्हाला कळल्यास सगळ्या डिवायसेसमधून ते लॉग आऊट करा.
संशयास्पद अकाउंट ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा - व्हॉट्सअॅप हे तुमच्या आप्तस्वकियांशी आणि जवळच्या लोकांशी बोलण्याचे मनमोकळेपणाने चॅट करण्याचे उत्तम माध्यम आहे. काहीवेळा यूजर्सना अननोन नंबर्सवरून फोन आणि मेसेजेच येतात. तेव्हा अशांना लगेच ब्लॉक करून टाका.