Whatsapp आता इंटरेटविना वापरता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

Whatsapp आता इंटरेटविना वापरता येणार

Whatsapp लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. घरापासून लांब असलेल्या आपल्या माणसांची ख्यालीखुशाली मिळण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून व्हॉट्सअॅपचा वापर खूप महत्वाचा ठरतो आहे. कोरोना काळात तर याचा वापर करण्याचे प्रमाण खूप वाढले होते. व्हॉटसअॅप वापरायचे असेल तर साहजिकच तुमच्याकडे इंटरनेट असणे गरजेच आहे. परंतु बरेचदा डेटा मर्यादित असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर कमी होतो. किंवा ते पाहिजे तसे वापरता येत नाही. अशा वेळी जर तुम्हाला इंटरनेटशिवाय Whatsapp आले तर, हो हे शक्य आहे.

हेही वाचा: WhatsApp च्या 'या' नवीन फीचरमुळे तुमची शॉपिंग होईल सुलभ!

चॅटसिमची मदत- इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर एका सीम कार्ड विकत घ्यावे लागेल. ChatSim या सीमद्वारे तुम्ही नेट नसले तरी अॅप्सचा वापर करू शकता. तसेच तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग, ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करता येऊ शकते. www.chatsim.com/personal या वेबसाईटवरून हे सीम तुम्ही खरेदी करू शकता. मात्र इतर सिम कार्डच्या तुलनेत ते महाग असून त्याची किंमत 1800 रुपये आहे.

या सीममध्ये विशेष काय?- हे सीम वापरल्याने अनेक फायदे मिळू शकतात.तु्म्ही आपल्या देशासह परदेशातही ते वापरू शकता. यावर तुम्हाला एक वर्षाची वैधता मिळू शकते. या चॅट सिमद्वारे अमर्याद मॅसेजेस आणि इमोजी पाठवू शकता.

हेही वाचा: WhatsApp स्टेटससाठी येतंय Undo बटण, चूक झाल्यास येणार कामी

Web Title: Without Internet You Can Use Whatsapp App Easily

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whatsappSim Card