कामांच्या पद्धतीतल्या मुक्ततेचं ‘फायव्हर’ सूत्र

Fiverr
Fiverr

‘गिग इकॉनॉमी’ म्हणजे कायमस्वरूपी नोकरीच्या ऐवजी छोट्या मुदतीच्या कॉंट्रॅक्ट्सवर किंवा फ्रीलान्स काम करणं. फायव्हर (Fiverr) या कंपनीचे संस्थापक मिशा कौफमन आणि शाई विनिंगर यांनाही विश्वास वाटला, की ‘गिग इकॉनॉमी’ हळूहळू वाढत जाईल; मात्र ही बाजारपेठ विकसित करायला हवी. याच विचारातून त्यांनी फ्रीलान्स सेवांची ऑनलाइन बाजारपेठ म्हणून ‘फायव्हर’ ही स्टार्टअप सुरू केली. स्टार्टअप ते न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या आणि नवीन पायंडे पाडणाऱ्या या कंपनीविषयी..

फ्रीलान्सर्ससाठीचे ई-कॉमर्स

  • ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मप्रमाणे ‘गिग जॉब्ज’साठी एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म तयार करण्याचा ‘फायव्हर’च्या संस्थापकांचा हेतू होता. विशिष्ट कौशल्यं असलेली कोणतीही व्यक्ती स्वतःची नोंदणी करू शकायची आणि स्वतःच्या सेवा संबंधित कंपन्या किंवा व्यक्तींना विकू शकायची. सुरुवातीला सेवासाठीचं किमान शुल्क पाच डॉलर इतकं होतं. मात्र, नंतर फेसबुकवर काही जणांच्या सेवेबाबत वाईट प्रतिक्रिया आल्यामुळे २०१३मध्ये त्यांनी या किमान शुल्काचं बंधन उठवून लोगो डिझायनर्स, ग्राफिक आर्टिस्ट्स वगैरेंना स्वतःचं मूल्य स्वतःच ठरवण्याची मुभा दिली. 
  • ‘फायव्हर’वर फ्रीलान्सर्स ‘गिग इकॉनॉमी’तल्या दोनशेपेक्षा जास्त विभागांमध्ये सेवांची नोंदणी करू शकतात. ग्राफिक डिझाईन, भाषांतर, कॉपीरायटिंग, मार्केटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसह अनेक सेवांचा त्यात समावेश असतो. बाजारपेठेच्या भाषेत ज्या कंपन्या त्यांची कामं वेबसाइटवर टाकतात, त्यांना ‘बायर्स’ म्हणतात, तर फ्रीलान्सर्स किंव गिग वर्कर्स यांना ‘सेलर्स’ असं म्हटलं जातं. ‘बायर्स’ना ज्या डिजिटल सेवा हव्या आहेत, त्या चर्चेत फार वेळ न घालवता किंवा शुल्काबाबत योग्य माहितीद्वारे मिळाव्यात आणि त्यांच्या पैशांना योग्य मूल्य मिळावं आणि त्याच वेळी ‘सेलर्स’ना योग्य ‘बायर्स’ मिळावेत, अशा पद्धतीनं हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

वाढीचा आलेख

  • ‘फायव्हर’ची २०१०मध्ये सुरवात झाली, तेव्हा आठ नोंदणीकृत विभाग होते आणि त्यांचं एकूण उत्पन्न अडीच लाख डॉलर (सुमारे दोन कोटी रुपये) इतकं होतं. पाच डॉलवरचा त्यांचा पहिला व्यवहार २०११मध्ये झाला आणि त्याच वर्षी त्यांनी दहा हजार ‘बायर्स’ जोडले आणि त्यांचं उत्पन्न दहा लाख डॉलरपर्यंत गेलं. २०१२मध्ये त्यांनी ‘गिग’ ट्रेडमार्कची नोंदणी केली आणि संस्थेअंतर्गत प्रोप्रायटरी लेव्हलिंग आणि रेटिंग सिस्टिम सुरू केली. २०१३  मध्ये ‘फायव्हर’नं  मोबाईल ॲप सुरू केल्यामुळे त्यांच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचं होतं. ते साजरं करण्यासाठी त्यांनी पहिलं ‘फायव्हर कम्युनिटी संमेलन’ही भरवलं होतं. २०१४मध्ये ‘बायर्स’च्या संख्येनं दहा लाखांचा आकडा ओलांडला. २०१५मध्ये त्यांनी ‘पॅकेजेस’ (फायव्हरवर सेवा विकण्यासाठीची अशी रचना, ज्यात सेलर्स त्यांच्या ‘बेसिक गिग’बरोबर आणखी काही गोष्टी एकत्र करून ‘बायर’ला हवी असलेली नेमकी सेवा देऊ शकतो) सुरू केली. त्याच वर्षी त्यांनी दहा लाख डॉलर्सचा मासिक उत्पन्नाचा टप्पा गाठला.
  • २०१७मध्ये त्यांनी ‘फायव्हर प्रो’ नावाचं एक नवीन उत्पादन सुरू केलं. ही ‘फायव्हर’ची पुढची आवृत्ती होती, ज्यात ‘गिग वर्कर्स’ हे उच्च दर्जाचे आणि निवडून, पारखून घेतलेले आणि मोठ्या ब्रँड्सचा विश्वास असलेले होते. २०१८मध्ये त्यांनी ‘बायर्स’चा पन्नास लाख डॉलरचा टप्पा गाठला आणि सध्या त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त विभाग उपलब्ध आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पर्धा

  • फ्रीलान्स मार्केटमध्ये अनेक नावीन्यपूर्ण बदल झाले. Upwork, Skyword360, freelancer.com, Peopleperhour.com, Guru.com, Envato Studio, Dribble Hiring आणि Anytask यांसारख्या कंपन्यांनी ‘फायव्हर’सारख्याच सेवा द्यायला सुरुवात केली. हे सगळे प्लॅटफॉर्म्स त्यांच्या पद्धतीनं उत्तम असले, तरी शेवटी ‘गिग वर्कर्स’ हेच ‘बायर्स’ना आकर्षित करत असल्यामुळे जे प्लॅटफॉर्म्स उत्तम एक्स्पोजर देतील, त्यांचीच निवड करण्याचे स्वातंत्र्य फ्रीलान्सर्सना असते. दीर्घकालीनदृष्ट्या विचार करता ज्या प्लॅटफॉर्म्सवर ‘गिग वर्कर्स’साठी वैविध्यपूर्ण आणि भरपूर काम उपलब्ध असतं त्यावरच त्यांचं यश अवलंबून असतं.
  • असे प्लॅटफॉर्म्स जेव्हा एखाद्याची सेवा एखादी कंपनी खरेदी करते तेव्हाच शुल्क आकारत असल्यामुळे फ्रीलान्सर्स सातत्यपूर्ण काम देणारा आणि त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळवून देणारा कोणताही प्लॅटफॉर्म निवडायला मुक्त असतात. 

पुढची वाटचाल
गेल्या दहा वर्षांत ‘फायव्हर’ची स्थापना झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या परिस्थिती काय फरक पडला आहे? लोक ‘फ्रीलान्स’ कामांबाबत जागरूक झाले आहेत आणि कायमस्वरूपी नोकरीला पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघत आहेत. अनेक उदयोन्मुख कलाकार, सर्जनशील तंत्रज्ञ आणि इतरांना शिकताशिकता किंवा नोकरी करताकरताही वेगवेगळे पर्याय धुंडाळण्याची संधी मिळाली आहे. नवीन पिढीच्या करिअरच्या आवडीही सर्जनशील कामांच्या दिशेनं झुकल्याचं सिद्ध झालं आहे. पारंपरिक नोकऱ्यांकडून डिजिटल नोमॅड्स किंवा गिग वर्करच्या कामांवर आधारित व्यवस्थेकडे सुरू असलेल्या या बदलासाठी ‘फायव्हर’ उत्प्रेरक म्हणून काम करते आहे.

निधीमध्ये वाढ
विस्तार करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोचवण्यासाठी ‘फायव्हर’ला निधीची गरज होती. त्यांनी मिळवलेला निधी आलेखात दाखवला आहे. सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी ‘फायव्हर’ला निधी हवा होता. या निधीमुळे त्यांना योग्य ती मर्जर्स आणि ॲक्विझिशन्स करता आली आणि बाजारपेठेतलं स्वतःचं महत्त्व कायम ठेवता आलं. 

१ जून, २०१० 
गाय गामझू आणि इतर एंजेल इन्व्हेस्टर्सकडून दहा लाख डॉलर्सची ‘सीड इन्व्हस्टमेंट.’

मे २०१२ 
ॲक्सेल पार्टनर्स आणि बेस्सेमेर व्हेंचर पार्टनर्सकडून दीड कोटी डॉलर्सची गुंतवणूक. (एकूण गुंतवणूक दोन कोटी डॉलर्सवर). ॲक्सेल आणि बेस्सेमेर यांचं बदल करण्याची क्षमता असणाऱ्या ग्राहक इंटरनेट कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा इतिहास. ॲक्सेलची Etsy, Kayak, Wonga, Dropbox आणि Spotify या कंपन्यांत, तर बेस्सेमेरची Skype, Pinterest, LinkedIn आणि Yelp यांत गुंतवणूक.

ऑगस्ट २०१४ 
बेस्सेमेर व्हेंचर पार्टनर्स, ॲक्सेल (आधीची ॲक्सेल पार्टनर्स) आणि इतर गुंतवणूकदारांकडून तीन कोटी डॉलर्सची ‘सिरीज सी’ गुंतवणूक. (एकूण गुंतवणूक पाच कोटी डॉलर्सपर्यंत.)

नोव्हेंबर २०१५ 
स्क्वेअर पेग कॅपिटलच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांकडून सहा कोटी डॉलर्सची गुंतवणूक. (एकूण गुंतवणूक ११ कोटी डॉलर्सपर्यंत.)

जून २०१९ 
न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणी. एकूण मूल्यांकन ६५ कोटी डॉलर्सवर (सुमारे चार हजार ५५० कोटी रुपये.)

  • गेल्या काही वर्षांत ‘गिग इकॉनॉमी’चा ट्रेंड बहरात आहे. ‘गिग इकॉनॉमी’ म्हणजे कायमस्वरूपी नोकरीच्या ऐवजी छोट्या मुदतीच्या कॉंट्रॅक्ट्सवर किंवा फ्रीलान्स काम करणं. फ्रीलान्सर्स हे त्यांच्या प्रत्येक कामानुसार किंवा कामाच्या प्रत्येक तासानुसार दर आकारून त्यांच्या सेवा देऊ शकतात. या प्रक्रियेला कोविड साथीमुळे गती आली आणि कंपन्या आणि व्यक्तींमध्येही अशा प्रकारच्या ‘गिग इकॉनॉमी’बाबत आत्मविश्वास निर्माण झाला. अर्थात अशा प्रकारच्या संधीचा वापर करून घेऊ शकतो, असा विचार करणारे आपण एकमेव नाही. 
  • फायव्हर (Fiverr) या कंपनीचे संस्थापक मिशा कौफमन आणि शाई विनिंगर यांनाही विश्वास वाटला, की ‘गिग इकॉनॉमी’ हळूहळू वाढत जाईल आणि योग्य कौशल्यं असलेला कोणीही बाजारपेठेतून काम मिळवू शकतो; मात्र ही बाजारपेठ विकसित करायला हवी. याच विचारातून त्यांनी फ्रीलान्स सेवांची ऑनलाइन बाजारपेठ म्हणून ‘फायव्हर’ सुरू केली. फेब्रुवारी २०१०मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. 
  • तात्पुरते जॉब्ज (गिग) लिस्ट करण्याच्या मॉडेलवर ‘फायव्हर’ आधारित होती. यात फ्रीलान्सर्स घर ते ऑफिस अशा कोणत्याही ठिकाणामधून काम करू शकतात. फ्रीलान्सर्स आणि कंपन्या यांना जोडणारा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असं फायव्हरचं स्वरूप. ॲमेझॉनवर ज्या प्रकारे वस्तूंची खरेदी होते, तशा प्रकारे कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मवर येऊन विविध फ्रीलान्सर्सच्या (गिग) सेवा घ्याव्यात अशी मुभा त्यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com