उद्या लॉंच होतायत Xiaomi चे 3 नवे स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत-फीचर्स

xiaomi 12s xiaomi 12s pro and xiaomi 12s ultra launch tomorrow check price and all details
xiaomi 12s xiaomi 12s pro and xiaomi 12s ultra launch tomorrow check price and all details

Xiaomi आपली फ्लॅगशिप 12S सीरीज उद्या म्हणजेच 4 जुलै रोजी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या येत्या Xiaomi सिरीजमध्ये तीन फ्लॅगशिप Android स्मार्टफोन्सचा समावेश आहे - बेस Xiaomi 12S, अपग्रेड केलेला Xiaomi 12S Pro आणि या सिरीजमधला सर्वात बेस्ट व्हेरिएंट Xiaomi 12S Ultra यांचा समावेश आहे, सध्या ही मालिका चीनमध्ये लॉंच होणार आहे.

लॉन्चच्या अगोदर, Xiaomi ने स्वतःच नवीन Xiaomi 12S सिरीजटे काही प्रमुख फिचर्स उघड केली आहेत. आणि उर्वरित डिटेल्स विविध लीक आणि टिपस्टर्सद्वारे उघड केले गेले आहेत. Xiaomi 12S सिरीज लाँच होण्याआधी, अपेक्षित स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत आणि आत्तापर्यंत आपल्याला माहित असलेल्या सर्व गोष्टींवर एक नजर टाकूया.

Xiaomi 12S सिरीजचे फिचर्स

- एंट्री-लेव्हल Xiaomi 12S मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.28-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. आधी उल्लेख केलेल्या अनेक लीक्सवरून असे दिसून आले आहे की, हा फोन स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेट सह येईल. काही रिपोर्टनुसार 67W फास्ट चार्जिंग पर्यायासह 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 50MP Sony IMX707 1/1/1.28-इंच सेन्सर आणि 5MP टेलिफोटो मॅक्रोसह 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल.

- Xiaomi 12S Pro मध्ये 50MP सेन्सर्ससह मागे Leica-ट्यून केलेले ट्रिपल कॅमेरे देणार असल्याचे समोर आले आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा असेल आणि तो Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सपोर्टसह येईल. अशा अफवा आहेत की Xiaomi MediaTek Dimensity 9000 chipset सह 12S Pro चा एक व्हेरिएंट देखील लॉन्च करू शकते. यात 4600mAh बॅटरी असेल जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

- या सिरीजमध्ये अधिक महागड्या प्रीमियम फ्लॅगशिप, Xiaomi 12S Ultra मध्ये चार मागील कॅमेरे असतील. अल्ट्रा व्हेरिएंटला 50MP Sony IMX989 1-इंच मुख्य कॅमेरा मिळेल, तर इतर सेन्सर्समध्ये 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5x ऑप्टिकल झूम असलेला 48MP टेलिफोटो कॅमेरा आणि 10x ऑप्टिकल झूम असलेला 48MP कॅमेरा समाविष्ट आहे. यात क्वालकॉमचा टॉप-ऑफ-द-लाइन स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 चिपसेट देखील असण्याची अपेक्षा आहे.

xiaomi 12s xiaomi 12s pro and xiaomi 12s ultra launch tomorrow check price and all details
ट्विटरची मोठी कारवाई! 46,000 भारतीय खात्यांवर घातली बंदी

Xiaomi 12S सिरीजची किंमत किती असेल? (संभाव्यता)

Gizchina कडून दिलेल्या रिपोर्टनूसार Xiaomi 12S सिरीजची किंमत Xiaomi 12 सिरीजच्या जवळपास असू शकते. Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro च्या किंमती चीनमधील बेस व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 43,580 रुपये आणि सुमारे 55,344 रुपयांपासून सुरू होतात. Xiaomi 12S सिरीजची अचूक किंमत लॉन्च झाल्यानंतर कंन्फर्म केली जाईल.

xiaomi 12s xiaomi 12s pro and xiaomi 12s ultra launch tomorrow check price and all details
आता व्हॉट्सअॅपवर तुमचं ऑनलाईन दिसणंही होणार हाईड ! लवकरच येणार नवं फिचर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com