दोन्ही बाजूने बघता येणारा टिव्ही होणार लाँच

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

नवी दिल्ली : शाओमीने वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्हीसारखी अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. आता शाओमी डबल साइड डिस्प्ले असणारा टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा टीव्ही उद्या (23 एप्रिलला) चीनमध्ये लाँच होणार आहे. 

शाओमीच्या टीव्ही विभागाचे महाव्यवस्थापक वेबो दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात कंपनी काही नवी उत्पादने आणणार आहे. शाओमीच्या टीव्ही विभागाने यापूर्वी एक टिझर पोस्टर लाँच केले होते. यात 23 एप्रिल रोजी 2019 च्या स्मार्ट टीव्ही लाइनअपचे पेइचिंगमध्ये लाँचिंग होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 

या प्रमोशनल टीझरमध्ये 'डबल साइडेड आर्ट'ची देखील घोषणा करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi to launch a double-sided TV on April 23