
Xiaomi Smartphone : Xiaomi 13 Series मध्ये लॉंच झाले हे ३ भन्नाट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
Xiaomi Smartphone : आज MWC 2023 इव्हेंट मध्ये Xiaomi 13 Series लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या नव्या रेंज मध्ये तीन मॉडेल लॉन्च केले आहेत. यात Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite मोबाईल सिरीज आहे. या मॉडेल्स मध्ये असलेला फरक आणि त्यांच्यामध्ये दिलेल्या फिचर्सची सविस्तर माहिती बघू.
Xiaomi 13 Pro Specifications
चिपसेट : स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन असलेल्या या फोनमध्ये 2 चिपसेट वापरण्यात आलेत. 12 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज देण्यात आलाय.
बॅटरी : फोनमध्ये 4820 mAh बॅटरी आहे, 120W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला.
कॅमेरा : बॅक पॅनलवर लीका ब्रँडेड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 50 मेगापिक्सेल सोनी IMX989 सेन्सर, 50 मेगापिक्सेल फ्लोटिंग टेलिफोटो सेन्सर आणि 50 मेगापिक्सेल वाइड-एंगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
डिस्प्ले : फोनमध्ये 6.73-इंचाचा OLED 2K डिस्प्ले आहे जो HDR 10 Plus आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो.
Xiaomi 13 Specifications
डिस्प्ले : फोनमध्ये 6.36-इंचाचा OLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900nits पीक ब्राइटनेस ऑफर करण्यात आलाय.
चिपसेट : फोनमध्ये 12 GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज Snapdragon 8 जनरेशन 2 चिपसेट आहे.
बॅटरी : फोनमध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67 W वायर्ड आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस लीका ब्रँडेड कॅमेरा, 50 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सरसह 10 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे.
Xiaomi 13 Lite Specifications
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 1 चिपसेटसह 8 जीबी रॅम आहे.
कॅमेरा : फोनच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 8 मेगापिक्सल सेकंडरी आणि 2 मेगापिक्सेल थर्ड कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. समोर 2 सेल्फी कॅमेरे आहेत आणि दोन्ही सेन्सर 32-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरसह येतात.
डिस्प्ले : फोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
बॅटरी : फोनमध्ये 67 वॅट टर्बोचार्ज टेक्नोलॉजी सह 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Xiaomi 13 price
Xiaomi 13 च्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, या डिवाइसची किंमत 87 हजार 600 रुपयांपासून सुरू होते. दुसरीकडे, Xiaomi 13 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, या हँडसेटची किंमत सुमारे 1 लाख 13 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. Xiaomi 13 Pro व्हाईट आणि सिरॅमिक ब्लॅक रंगात लॉन्च केलाय, तर Xiaomi 13 ग्रीन, ब्लॅक आणि व्हाईट आणि Xiaomi 13 Lite पिंक, ब्लॅक आणि ब्लू रंगात लॉन्च केलाय.