नासा पाठविणार चक्क मंगळावर तुमचे नावं!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

- नासाने मंगळावर पाठवली 75 लाख 27 हजार 879 नाव
- नासा'ने दिली ही 'नामी' संधी
- 'नासा'चे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार
- स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुणा सोडण्याची संधी
- सिलिकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या (75 नॅनोमीटर) रुंदीत नोंदविणार नावे
- एक डेमी आकाराच्या चीपवर दहा लाख नावे मावतील
- चीप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठविल्या जातील.
- या उपक्रमात 30 सप्टेंबर अखेर पर्यंत नाव नोंदविता येणार 
-  mars.nasa.gov  या संकेतस्थळावर नोंदवा तुमचे नाव

आज पर्यंत घराच्या भिंती, उद्घाटनाचे फलक, शरीरावरील टॅटू आणि तांदळाच्या दाण्यावर आपले नाव कोरता येत होते. आता चक्क मंगळावर नाव कोरण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था "नासा'ने आपल्याला ही "नामी' संधी उपलब्ध केली आहे. 

'नासा'चे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. त्यासाठी स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुणा सोडण्याची संधी "नासा'ने जगभरातील नागरिकांना दिली आहे. आत्तापर्यंत 75 लाख 27 हजार 879 लोकांनी नोंदणी केली आहे.

"नासा'च्या पसाडेना (कॅलिफोर्निया) येथील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतल्या "मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक बीम'चा वापर करून सिलिकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या (75 नॅनोमीटर) रुंदीत आपण नोंदविलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. अशा एक डेमी आकाराच्या चीपवर दहा लाख नावे मावतील. या चीप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठविल्या जातील. या उपक्रमात 30 सप्टेंबर अखेर पर्यंत mars.nasa.gov  या संकेतस्थळावर नाव नोंदविता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you can send your name on mars