व्हॉट्सऍपवर आता मेसेज एडिट करण्याची सोय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

न्युयॉर्क - गृहिणींपासून ते ऑफिसच्या कामकाजाच्या मेसेजेसपर्यंत आजकाल सोय म्हणून व्हॉट्सऍपचा वापर चांगलाच वाढला आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची सख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे युजर्ससाठी सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सऍप नेहमीच करते. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करून दिला होता. आता व्हॉट्सऍपवर लवकरच चुकून गेलेले मेसेज एडिट करण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

WABetaInfo या ट्विवटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फिचर्स युजर्सना देणार आहे. त्यामुळे, युजर्स ठराविक वेळेमध्ये पाठवलेले मेसेज डिलीट किंवा इडिट करु शकणार आहेत.

सध्या मात्र यामध्ये जुना मेसेज एडिट करता येणार नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You may soon recall, edit messages on WhatsApp