एकूण 90 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : कुणी घर देता का घर, चार भिंतींचं घर...कुणी शाळा देता का रे, शाळा... कुणी नोकरी देता का रे, नोकरी...ही अवस्था असते विस्थापितांची. मग विदर्भातील गोसेखुर्दचे विस्थापित असोत की नर्मदा धरणाचे. साडेतीन दशकांहून जास्त काळ उलटूनही विस्थापितांच्या पोटात सुखाचे चार घास पडले नाहीत. या व्यथांची कथा...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने मान्य केल्यास...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : दहा दिवस मुक्‍कामी असलेल्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली असून शहर पोलिस "श्रीं'च्या विसर्जनासाठी असलेल्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. आज बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारा नागपूर शहर पोलिस दलाचे प्रमुख पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी फुटाळा तलावावर बंदोबस्ताचा आढावा घेतला....
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या मंगळवारी (ता.27 ) रविभवन येथे घेण्यात येणार आहेत. भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार अतुल भातकर इच्छुकांसोबत चर्चा करणार आहेत. जिल्ह्यात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर ः नंदनवन हद्दीतील सेनापतीनगर येथे राहणारा विक्की विजय डहाके (22) या तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना, तर सय्यद इमरान हत्याकांडातील दोन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली, अशी माहिती परिमंडळ-4च्या नवनियुक्त पोलिस उपायुक्त निर्मलादेवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. खुनाची पहिली घटना सेनापतीनगर...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : सायंकाळ होत आली की त्यांच्या हृदयाची धडधड वाढते...आपली कच्चीबच्ची घेऊन त्या घरात बंदिस्त होतात...भांडणाला आज काय नवीन कारण, या विचाराने त्यांचे अंग घामाघूम होते...रात्र झाली की बहुतांश घरातून भांडणाचे, रडण्याचे आवाज...हे ऐकले की अंगावर अक्षरश: काटा उभा राहायचा...कर्ता पुरुष दारुडा...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : शहरातील ऍड. अनिल किलोर व ऍड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदाची शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेला हा शपथविधी सोहळा नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात लाइव्ह बघण्याची व्यवस्था करण्यात आली...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : आरटीओ कार्यालय. अधिकाऱ्यांची आरडाओरड सुरू होती. एका स्कूल बसवर त्या अधिकाऱ्याने जप्तीची कारवाई केली. मात्र या स्कूलबसमध्ये आठ ते दहा चिमुकली मुले रडत होती. अधिकाऱ्यांच्या किंचाळण्यामुळे ही चिमुकले मुले पुरती घाबरली. मात्र या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. वाहन जमा करण्यासाठी...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर ः वाडी पोलिसांनी विनाकारण खोट्या गुन्ह्यात गोवल्यानंतर चौकशीच्या नावाखाली मानसिक व शारीरिक त्रास देत असल्यामुळे एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल प्रभाकर ठवरे (29, नेताजीनगर, कळमना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर ः नंदनवनमधील राजेंद्रनगर चौक, एसबीआय एटीएमजवळ दुचाकीवरील तीन आरोपींनी दहा रुपयांच्या अद्रकच्या (आले) पैशावरून एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. तर भाजीविक्रेत्याला गंभीर जखमी केले. हे हत्याकांड आज बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडले. मो. इम्रान मो. नियाज (वय 26, हसनबाग) असे खून...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या...
ऑगस्ट 21, 2019
वाडी/सोनेगाव (जि.नागपूर) : आयुधनिर्माणी अंबाझरीसह देशातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू झाला. आयुधनिर्माणी कारखान्याचे खासगीकरण व महामंडळ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील आयुधनिर्माणी कारखान्यातील कामगार संघटना एकवटल्या आहेत....
ऑगस्ट 18, 2019
वाडी/सोनेगाव (जि.नागपूर) : आयुध निर्माणीच्या प्रस्तावित निगमीकरण व खासगीकरण धोरणाचा तीव्र निषेध करीत केंद्रातील आयुध निर्माणी अंबाझरीच्या कर्मचा-यांनी मोठया संख्येने एकत्रित येऊन परिवारासह मोर्चा काढला व मोदी सरकारच्याविरोधात नारेबाजी केली. केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात मागील एक महिन्यांपासून...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : पन्नास वर्षांपासून रिपब्लिकन नेते सत्तेसाठी कधी कॉंग्रेस तर कधी भाजपच्या दारावर उभे असतात. हा एकूणच आंबेडकरी समाजाचा अपमान आहे. या नेत्यांनी आंबेडकरी समाजाला वेड्यांच्या पंक्तीत बसवले. या नेत्यांचे वर्तन आता खपवून न घेता त्यांच्या या समाजद्रोहाविरुद्ध आंबेडकरी कार्यकर्ते उठाव करणार आहेत....
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत कुणाचाही विश्‍वास बसणार नाही, असा धक्कादायक निकाल लागला. यामुळे मतदारही अचंबित आहेत. तर निवडून आलेल्यांनाही विश्‍वास नसून पराभूतांना मोठा धक्का बसला आहे. गत दोन महिन्यांपासून यावर देशभरात चर्चा होत असताना निवडणूक आयोग त्यावर व्यक्त होताना दिसत नाही. "इंडिया अगेन्स्ट...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी सकाळी भंडारा जिल्याकडे निघताना प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यात्रेच्या मार्गात निदर्शने करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा शहरात होती. ही माहिती पोलिसांना मिळताच लोंढेंना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली...
ऑगस्ट 01, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातून नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचे व रहिवासींचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली....
जुलै 30, 2019
नागपूर : कॉंग्रेसच्या इच्छुक उमेवारांच्या प्रक्रियेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असून जे लढणार आहेत तेच मुलाखती कसे काय घेऊ शकतात, असा सवाल अनेकांनी खासगीत बोलताना केला आहे. विधानसभा निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आज देवडिया भवन येथे घेण्यात आल्या. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल...
जुलै 25, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे बांधकाम केव्हापर्यंत पूर्ण होतील, आतापर्यंत किती काम पूर्ण झाले आणि किती बाकी आहे. यांसदर्भात सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) प्रतिज्ञापत्र दाखल करून 24 सिंचन...
जुलै 21, 2019
नागपूर : आपल्या आवडीची गाडी घेतल्यानंतर गाडीचा विशिष्ट नंबर असला पाहिजे, अशी अनेक गाडीप्रेमींची भावना असते. विशिष्ट नंबर असणे हा अनेकांच्या श्रद्धेचा, तर अनेकांच्या अंधविश्‍वासाचाही भाग असतो. त्यामागे कुणाचे अंकगणित असते, तर कुणाचे भाग्य आणि भविष्याचेही ठोकताळे असतात. मग विशिष्ट नंबर मिळविण्यासाठी...