एकूण 71 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना...
मे 28, 2019
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली ताकत दाखवून दिली आहे. त्यामुळे पुणे शहर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक चिंतन बैठक पुणे येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात पार पडली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि उत्साह पाहून पुण्यातील सर्व आठही मतदारसंघ ताकतीने...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 22, 2019
मुंबई - मुंबई भाजप अध्यक्षपदी सलग दोन वेळा आमदार असलेले आशिष शेलार यांच्या जागी कुणीची वर्णी लागणार, याबाबत सध्या खलबते सुरू आहेत. यामध्ये योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग आळवणी यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोटक यांचे पारडे जड असल्याचे...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि...
मे 15, 2019
मोदी लाटेतही शाबूत राहिलेला सातारा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचे एक-दोन तरी तट कसे कोसळतील, याचे मनसुबे या लोकसभा निवडणुकीत शिजले आहेत...  ‘आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे....
मे 08, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवून आम्हीच सत्तेत येणार, हा भाजपच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल, असे सांगत भाजप बहुमताच्या जवळपासही जाणार नाही, असे भाकीत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुण्यात केले. महाआघाडी आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 23, 2019
ऐतवडे खुर्द (सांगली) : लोकसभेसाठी मतदान आणि ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा एकाच दिवशी आली. परिणामी, मतदानात यावर्षी तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढूनही दिवसभर मतदान केंद्रावर एकदाही रांग लागली नाही, हे विशेष. ऐतवडेतील भैरवनाथ यात्रेचा मंगळवारी (ता. २३) पहिलाच दिवस होता. त्यामुळे...
एप्रिल 21, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी शनिवारी प्रचारफेरी शक्तिप्रदर्शन केले. सुजात प्रकाश आंबेडकर फेरीत सहभागी झाले होते.   विश्रांतवाडी चौकातून फेरीला सुरवात झाली. सुजात आणि जाधव यांचे नागरिकांनी स्वागत केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 14, 2019
गुजरात राज्‍यात लोकसभा निवडणूकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याच्‍या निवडणूकीची प्रक्रीया सुरू होण्या अगोदरच ओबीसी समाजाचे नेते अल्‍पेश ठाकूर यांनी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्‍याने काँग्रेस पक्षाला धडकी भरली आहे,त्‍यात अल्‍पेश यांची नेमकी भूमिका स्‍पष्ट न झाल्‍याने भाजपवर देखील त्‍याचा...
एप्रिल 11, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मालेगावपाठोपाठ मुस्लिमबहुल धुळे शहर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. यात युती, आघाडीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी त्या- त्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची चढाओढ असणार आहे. यात निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी त्याचा...
एप्रिल 10, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यामध्ये शरिराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे तसेच अवैध व्यवसाय करणारे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. 21 वर्षांपासून फरार असलेले आरोपीही पोलिस...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...