एकूण 36 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन केले यानंतर...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 23, 2019
ऐतवडे खुर्द (सांगली) : लोकसभेसाठी मतदान आणि ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा एकाच दिवशी आली. परिणामी, मतदानात यावर्षी तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाचा टक्का वाढूनही दिवसभर मतदान केंद्रावर एकदाही रांग लागली नाही, हे विशेष. ऐतवडेतील भैरवनाथ यात्रेचा मंगळवारी (ता. २३) पहिलाच दिवस होता. त्यामुळे...
एप्रिल 22, 2019
पुणे - ""देशातील लोकशाही काही कुटुंबांमध्ये कैद झाली आहे. लोकशाही फुलवायची असेल, तर तिची घराणेशाहीतून मुक्तता केली पाहिजे. त्यातून सामान्य माणसांचे प्रश्‍न सुटतील,'' असा विश्‍वास वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केला.  आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव,...
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 21, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी शनिवारी प्रचारफेरी शक्तिप्रदर्शन केले. सुजात प्रकाश आंबेडकर फेरीत सहभागी झाले होते.   विश्रांतवाडी चौकातून फेरीला सुरवात झाली. सुजात आणि जाधव यांचे नागरिकांनी स्वागत केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर...
एप्रिल 20, 2019
सातारा : राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. एक नरेंद्र पाटील किंवा देवेंद्र फडणवीस निवडून नाही आला तरी फरक पडणार नाही. मात्र, देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 19, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग महाराष्ट्रभर चर्चिला जातोय. राजकीय सभेत पुराव्यांसह विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी एलईडी स्क्रीनचा वापर आपल्या भाषणात खुबीने केला. त्यांना ऐकायला येणाऱ्यांनाही ते पचनी पडत असून नुसते "लाव रे..' म्हटले तरी लोकांच्या टाळ्या, शिट्या वाजायला...
एप्रिल 18, 2019
आळेफाटा - ‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे राहून निवडणुकीत इतिहास घडवावा,’’ असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.     निमगाव सावा (ता. जुन्नर...
एप्रिल 18, 2019
पुणे - वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुदुद्दीन ओवेसी यांची रविवारी (ता. २१) जाहीर सभा होणार आहे. एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर दुपारी दोन वाजता सभा होईल.   आघाडीचे समन्वयक लक्ष्मण माने, हरिदास बधे,...
एप्रिल 17, 2019
लोकशाही 2019 हिंगोली : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता. 17) सकाळपासूनच आवश्यक साहित्यासह रवाना झाले आहेत.  हिंगोली लोकसभा मतदार संघात गुरुवारी (ता. 18) मतदान होणार आहे. लोकसभा मतदार संघात एक हजार 189 मतदान...
एप्रिल 16, 2019
आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली....
एप्रिल 10, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या प्रचाराच्या कारणावरून मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगले आहे. या नाट्यातून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब भवर व त्यांचे अतुल भवर यांची युवा सेनेतून हकालपट्टी करून बळी देण्याचा प्रयत्न झाला....
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
एप्रिल 09, 2019
मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, असे...
एप्रिल 08, 2019
वरुड (जि. अमरावती) -  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युतीतर्फे जरुड येथे आयोजित सभेत एका युवकाने प्रश्‍न विचारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरुडातील गुजरीबाजार चौकात शनिवारी (ता. सहा) उशिरा...