एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नांदेड : ‘राज्यातील भाजप सरकारने मेगा भरतीच्या नावाखाली ७२ हजार जागांची भरती करु असे आश्‍वासन दिले होते. परंतु ती मेगाभरती नोकरभरतीची नव्हती तर पक्षातल्या भरतीची होती, असा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व आमदार धनंजय मुंडे यांनी केला. नांदेड येथे गुरुवारी (ता. १९) शंकरराव चव्हाण...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
मे 27, 2018
"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या "तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे...
फेब्रुवारी 19, 2018
नवी मुंबई - ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील सर्वांत मोठे पहिले ग्रीनफिल्ड ठरेल,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘अटकाना, लटकाना और गटकना’ यातच मागील सरकारला रस होता. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याची टीका त्यांनी या वेळी काँग्रेसवर केली. नवी...
फेब्रुवारी 01, 2018
साताराः जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज शेवटचे बजेट जाहीर करत आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार...
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
ऑक्टोबर 23, 2017
घोघा (गुजरात) : गुजरातमध्ये निवडणूक तारखा जाहीर करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून राजकीय धुरळा उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सौराष्ट्रला दक्षिण गुजरातशी जोडणाऱ्या "रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो)' नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन झाले. आपल्या स्वप्नवत प्रकल्पाचे...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
डिसेंबर 26, 2016
मुंबईनजीक अरबी समुद्रात उभारण्यात येणारे जागतिक कीर्तीचे शिवस्मारक हे मराठी तरुणांना प्रेरणा आणि नव्या जगातील कर्तबगारीसाठी ऊर्जा देत राहील. अशा या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सर्व राजकीय पक्षांना सामावून घेतले असते, तर हा समारंभ अधिक उंचीवर नेता आला असता. मराठी मुलुखाची अस्मिता,...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - केंद्रीय पुरातत्व खात्याच्या जोखडातून राज्यातील गड-किल्ले मुक्‍त करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - शिवस्मारकाच्या उद्‌घाटन समारंभानंतर बांद्रा-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तुंबळ वाक्‌युद्धाचे गालबोट लागलेच. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा शिवसेनेने सुरू करताच भाजपने "मोदी, मोदी' असे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. अखेर...
डिसेंबर 24, 2016
मुंबई :'आजच्याच दिवशी 352 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन शिवाजी महाराजांनी केले होते. आज त्यांचे सेवक म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जात आहे. हे जगातील सर्वांत उंच स्मारक असेल. 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी'ने अमेरिका ओळखली जात असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य...
डिसेंबर 24, 2016
नाशिक : मुंबईतील अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती. शिवस्मारकाला 15 फेब्रुवारी 2015मध्ये समुद्रकिनारा नियामक विभागाची परवानगी मिळाली होती. मग गेल्या वर्षभरात भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी मुहूर्त...
डिसेंबर 24, 2016
देवेंद्र फडणवीस हे रुढार्थाने कोणतेही पाठबळ नसलेले तरुण नेते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकल्याने. हा विश्‍वास सार्थ असल्याचा परिचय फडणवीस देत आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांचा कठीण असणारा पट चित करून ते आता नवी बेरजेची समीकरणे मांडायला...
डिसेंबर 23, 2016
पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही...
डिसेंबर 22, 2016
बीड - मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होणार आहे. याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती...