एकूण 144 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
सप्टेंबर 23, 2019
अलिबाग : अरबी समुद्रातील वादळाच्या शक्‍यतेने परराज्यातील मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील बंदरांचा आधार घेतला आहे. त्यांनी पकडलेल्या करळी, पापलेट अशी नानाविविध मासळीची ठिकठिकाणच्या बंदरात विक्री केल्याने माशांचा जणू पूरच आला आहे. त्यामुळे मासळी स्वस्त झाली आहे. अलिबाग मासळी बाजारात तर...
सप्टेंबर 19, 2019
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका दुर्घटनाग्रस्त झाली. बोटीच्या पंख्यामध्ये मासेमारी जाळे अडकल्याने नौका समुद्रातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने नौकेला भलेमोठे भगदाड पडले. बोटीतील खलाशांनी प्रसंगावधान राखत नौका किनाऱ्यापर्यंत आणली....
सप्टेंबर 16, 2019
रत्नागिरी - पंधरा दिवसांनी वातावरण निवळल्याने समुद्रात झेपावलेल्या मच्छीमारांची निराशा झाली. शनिवारी (ता. 14) एक दिवस समाधानकारक मच्छी काहींना मिळाली; मात्र एका रात्रीत वातावरणाने रंग बदलला आणि मच्छीमारांचे दिवस फिरले. वेगवान वारे, पाण्याला असलेला करंट यामुळे मासेमारीत अडथळा येत होता. त्यामुळे एका...
सप्टेंबर 11, 2019
बोर्डी ः डहाणू परिसरात गेल्या महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोर्डी, घोलवड, झाई परिसरातील माच्छी, मांगेला आदिवासी समाजातील मच्छीमारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. पावसामुळे बोटी समुद्रात उतरवणे धोकादायक असल्याने त्या किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.  झाईच्या बंदरावर...
सप्टेंबर 10, 2019
मुरूड : नारळी पौर्णिमेनंतर रायगड जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका समुद्रात होत्या. चार दिवसांपासून वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने यामधील बहुतांशी नौकांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुरूड, आगरदांडा आणि खोराबंदर किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. या बोटी करंजा, मोरा, अलिबाग आदी गावांतील असून काही रत्नागिरी...
सप्टेंबर 04, 2019
रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या पावसाचा जोर गेले तीन दिवस कायम आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे गणेशभक्‍तांना घरातून बाहेर पडणे शक्‍य होत नव्हते. खवळलेल्या समुद्रामुळे मुंबई, रायगडसह परजिल्ह्यातील शेकडो नौकांनी सुरक्षेसाठी जयगड किनारा गाठला होता. पुढील...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. सुरवातीला कोळंबीची लॉटरी लागली, पण पुन्हा पाच वावाच्या पुढे समुद्राच्या पाण्याला ओढ असल्याने छोट्या नौकांद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार बंदरात परतू लागले आहेत. त्यातच म्हाकुळ, तार्ली मिळत नसल्याने मच्छीमार...
ऑगस्ट 24, 2019
रोह : पंधारा दिवसांपूर्वी मासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले होते. पावसाळ्यातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात आल्यानंतर ते 20 ते 30 टक्‍क्‍यांनी उतरले आहेत. त्यामुळे या बाजारात स्वस्ताई आली आहे. बोंबलांचा भाव प्रति किलो 100 रुपये झाला आहे.  पावसाळा सुरू झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई  : तालुक्‍यातील रेवस- बोडणी येथील सुमारे 200 हून अधिक मच्छीमार नौकांनी वादळात भरकटल्यानंतर जयगड बंदराचा आधार घेतला होता; परंतु तेथील मच्छी व्यापाऱ्यांनी मासळी उतरविण्यास विरोध केल्याने अलिबाग येथील मच्छीमारांचे सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही मासळी परत अलिबाग येथे आणणे शक्‍य...
ऑगस्ट 19, 2019
अलिबाग : पावसाळी बंदीनंतर सुरू झालेल्या मासेमारीच्या पहिल्याच फेरीत अलिबागमधील मच्छीमारांना तब्बल 4 हजार 500 किलो मांदेलीची बम्पर लॉटरी लागली आहे. या लॉटरीमुळे 15 बोटींचे मालक मालामाल झाले आहेत.  पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे जुलैअखेरपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी होती. आता बंदी संपुष्टात...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होऊ लागल्यामुळे मच्छीमारांनी लाटांवर स्वार होत, मासेमारीला जाण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मिरकरवाडासह विविध ठिकाणच्या बंदरांवरील गजबज वाढली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन मच्छीमार खोल समुद्रात जात आहेत. हंगामाच्या आरंभीला टायनी चिगळांसह...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - पावसाचा जोर कमी झाला असला तरीही वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी पहाटेला मच्छीमारीसाठी बाहेर पडलेली "अलीना' मच्छीमारी नौका शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी बुडाली. खडकावर आपटून त्या नौकेला जलसमाधी मिळाली, त्यातील 5 बचावले. एक खलाशी...
ऑगस्ट 15, 2019
पनवेल : दरवर्षी श्रावणात बोंबलाची आवक मोठ्या प्रमाणात होते; मात्र या वर्षी पावसाची नियमितता, पूर, समुद्रातील वादळ आदी विविध कारणांमुळे त्यांची आवक घटल्याने चढ्या दराने विक्री सुरू होती. मागील आठवड्यात तर त्यांची ३०० ते ४०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. आता आवक वाढल्याने त्यांचा भाव प्रति...
ऑगस्ट 15, 2019
उरण : मुसळधार पावसामुळे खवळलेल्या दर्याला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पनवेलसह उरणमधील मच्छीमार बांधव दर्याराजासमोर नतमस्तक झाले. पनवेलसह उरणमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढत खोल समुद्रात नारळी पौर्णिमा म्हणजेच सोन्याचा नारळ अर्पण करून हा सण उत्साहात साजरा केला.  मासेमारीसाठी वर्षभर...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : कुलाबा किल्ल्याजवळील एका खडकावर मासेमारीसाठी निघालेली करंजा येथील बोट आदळली. त्यामध्ये बोटीला भगदाड पडून बोट बुडाली; परंतु बोटीतील आठ खलाशांनी डिझेलचे ड्रम व बोयांच्या मदतीने वरसोली किनारा गाठला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही बोट लाटांसोबत वरसोली समुद्रकिनाऱ्यावर आली. बोटीचा एक भाग...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनाऱ्यांसह, कोळीवाड्यांत बुधवारी (ता.१४) मोठा उत्साह पाहायला मिळाला. ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई ः नारळी पौर्णिमेच्या सणासाठी नवी मुंबई आणि परिसरातील कोळीवाडे आणि ठिकठिकाणच्या मासेमारी जेट्टी सजल्या आहेत. शासनाने खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी १ ऑगस्टलाच उठवली असली; तरी नवी मुंबई परिसरातील अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच मासेमारी सुरू करतात. त्यामुळे सध्या...
ऑगस्ट 09, 2019
रत्नागिरी - मासेमारी बंदी उठल्यानंतर अतिवृष्टी आणि वादळी वार्‍याची तमा न बाळगता समुद्रात गेलेल्या रायगड आणि मुबंईच्या मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. समुद्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेसाठी 250 नौकांनी जयगड बंदराचा आश्रय घेतला आहे. रविवार 11 पर्यंत हायअलर्ट असल्याने आणखी दोन दिवस...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार समुद्रातील हवामान धोकादायक असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात नेऊ नयेत, असा इशारा रायगड जिल्ह्याचे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे-इनामदार यांनी दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. या सूचना मच्छीमार बांधवांना देण्यासाठी मच्छीमार...