एकूण 150 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
ऑक्टोबर 14, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४२ आश्‍विन पौर्णिमा. आजचा वार : संडेवार. आजचा सुविचार : चांद को क्‍या मालूम चाहता है उसे कोई चकोऽऽओओओओर!! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) आज काय लिहू या डायरीत माझ्या? सारे शब्दच संपले! आज कोजागरी पौर्णिमा... को जागर्ति असे विचारीत फिरायची...
ऑक्टोबर 11, 2019
शहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग पावसाचे थेंब मोठमोठे बनतात आणि झपाट्याने बरसत आपल्याला जबरदस्त तडाखे देतात. अलीकडच्या घटनांतून त्याचा प्रत्यय आला आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा. केरळची...
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
ऑक्टोबर 08, 2019
सकाळ झाली. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘‘मोऱ्या, लेका, घोरत काय पडलाहेस? आज दसरा. शिलंगणाचा दिवस. ऊठ, तोंड विसळ. स्नान कर आणि बाहेर चालता हो कसा?’’ त्यावर मोऱ्याने पांघरूणात आणखीनच खोल तोंड खुपसले व तो निऱ्हानाम घोरू लागला. ते पाहून पित्त खवळलेल्या मोऱ्याच्या बापाने दातओठ खात त्याचे...
सप्टेंबर 17, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर भाद्रपद कृ. तृतीया. आजचा वार : हॅप्पीबर्थडे! आजचा सुविचार : तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सिद्धमंत्राचा जप लिहून लक्ष केव्हाच पुरा झाला. आजच्या पवित्र दिनी जपाच्या वह्या समुद्रार्पण करावयाची वेळ आली आहे. याच...
सप्टेंबर 12, 2019
भारत-रशिया यांच्यात सागरी सहकार्याचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मैत्रीच्या उच्चतम शिखरावर असताना सागरी सहकार्य वाढविणे आणि या सहकार्याचे रूपांतर सामरिक भागीदारीत करणे, असे दुहेरी आव्हान उभय देशांसमोर होते. रशियातील ताज्या बैठकीत या दिशेने काही पावले पडली असली, तरी ती अधिक ठोस असणे गरजेचे...
सप्टेंबर 10, 2019
मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाला असणारे निसर्गदत्त मूलभूत अधिकार. हे अधिकार त्याला जन्मतःच मिळतात. पण, तरीही त्यावर आक्रमण होत असते. त्यामुळेच ते अबाधित राहण्यासाठी प्रयत्नांची, सतत जागरूक राहण्याची आवश्‍यकता असते. त्यादृष्टीने लेखाच्या माध्यमातून या विषयावरील संवादाचा हा उपक्रम. मानवाधिकार...
सप्टेंबर 09, 2019
‘कॉमन इंटरनॅशनल ट्रीटी ऑन एन्डेंजर्ड स्पेसीज’ (साईट्‌स) हा १८२ राष्ट्रे व युरोपीय समुदाय असे १८३ सभासद असलेला एक जागतिक सामंजस्य करार. वन्य पशू, पक्षी आणि वनस्पती या मानवेतर सृष्टीच्या संवर्धन-संरक्षणासाठी हा करार मूलभूत व महत्त्वाचा आहे. १७ ते २८ ऑगस्ट दरम्यान या कराराची १८वी जागतिक परिषद...
सप्टेंबर 09, 2019
पूर्वी लोकसंख्या कमी होती. गावं, शहरं आकारानं लहान होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मोजकीच होती. गणेशोत्सवाचं असं स्वरूप विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होतं. नंतर बदल होत गेले आणि उत्सवाला स्पर्धेचं स्वरूप आलं. कोणत्या मंडळाचा गणपती किती मोठा, कुठली आरास मोठी असं करत मूर्तींचे आकार वाढत...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
ऑगस्ट 21, 2019
‘ये रे ये रे पावसा’ अशी प्रार्थना करणारे आपण अवघ्या पंधरवड्यात ‘नको नको रे पावसा’ अशी आळवणी करायला लागलो आहोत. चराचराला चैतन्याचं दान देणारा पाऊस यंदा अधिकच बरसतोय. उन्हाशी लपंडाव खेळत, लता-वेलींशी झिम्मा खेळत येणाऱ्या नाजुक-साजुक श्रावणसरींनी अक्राळविक्राळ रूप धारण केलं. रानावनाला, शेतशिवाराला...
ऑगस्ट 17, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात कृष्णा, कोयना आणि भीमा या प्रमुख नद्यांच्या परिसरात गेला आठवडाभराहून अधिक काळ महापुराची स्थिती होती. त्यामुळे तब्बल आठ-दहा हजार कोटींहून अधिक पिकांची हानी झाली. सरकारी मदत अथवा अन्य माध्यमांतून ती काही प्रमाणात भरून निघेल, परंतु त्यापेक्षा झालेली जीवितहानी मोठी वेदनादायी आहे....
जुलै 26, 2019
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती....
जुलै 19, 2019
महाराष्ट्राची प्रगतिपथावर चाललेली वाटचाल आणि त्याबरोबरच दिवसेंदिवस होणाऱ्या आपत्तीच्या घटना व त्यातून होणारी जीवितहानी ही एक गंभीर बाब आहे. आज समाजात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता आली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातील कार्यप्रणालीही समाधानकारक असली, तरीही त्यात अधिक परिणामकारकता यायला हवी. वारंवार...
जुलै 10, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोटी-मोठी ९५ धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. कोकणातील नद्यांची रचना, वेग, भौगोलिक, भूरूप रचना, भूकंप या गोष्टी उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे केवळ धरणच नाही, तर जलसंधारणाची कोणतीही कामे करताना स्वतंत्र धोरण आखणे गरजेचे आहे....
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ शकेल....
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 04, 2019
हिरमुसलेल्या इतिहासपुरुषाने मलूलपणाने पाहिले. शेजारीच लेखणी धारातीर्थी पडली होती. बखरीचा कागद भेंडोळावस्थेत गतप्राण पडला होता. आता काय लिहायचे? कसे लिहायचे? कधी लिहायचे?...मुळात कां लिहायचे? होत्याचे नव्हते झाले. इतिहास घडता घडता एकदम काहीच्या काहीच होऊन बसले. इतिहासपुरुषाच्या नजरेत नोकरी...