एकूण 135 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली : केरळमध्ये आलेल्या पुराने तेथील सगळे जनजीवन विस्कळीत केले आहे. वायनाड, इडुक्की, थालापुझा, एर्नाकुलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.  पूरग्रस्त केरळमधील मदत आणि बचावकार्याला वेग आला असून, तिन्ही सेना दले आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 13, 2018
औरंगाबाद- 'यळकोट यळकोट जय मल्हार' चा जयघोष करत तसेच पारंपारिक वाघ्या- मुरळीच्या वेश परिधान करुन जागरण गोंधळ घालत,  धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (ता. 13) चिकलठाणा येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  धनगर समाजाला...
ऑगस्ट 12, 2018
नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.  मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...
ऑगस्ट 09, 2018
पुणे (औंध) - सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळूंगे (पाडाळे) परिसरातील मोर्चेकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले तसेच नागरीकांनीही शांततेत सहकार्य केले. या दरम्यान म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडी येथील सर्व प्रकारची दुकाने...
ऑगस्ट 09, 2018
अहमदनगर - 'सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक घोषणा केल्यात. धनगर समाजाला देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही याबाबत कारवाई नाही.' असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. तसेच सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते पुढे...
ऑगस्ट 08, 2018
मुरूड (जि. लातूर)  : मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून माटेफळ (ता. लातूर) येथील शिक्षक रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड होताच आरक्षणाच्या मागणीवर अगोदरच आंदोलनाच्या तयारीत असलेले ग्रामस्थ आणि युवक संतप्त झाले. येथील ग्रामीण रूग्णालयात रमेश पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (...
ऑगस्ट 07, 2018
सोमेश्वरनगर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात प्राथमिक शिक्षक संघासह प्राथमिक शिक्षकांच्या सर्वच संघटना उतरल्या आहेत. स्वतःच्या मागण्याही या आंदोलनात पुढे रेटल्या आहेत. यामुळे संपाची तीव्रता वाढली असून पुणे जिल्ह्यातील असंख्य शाळा आज बंद होत्या. बारामती तालुक्यात तर तब्बल नव्वद...
ऑगस्ट 07, 2018
नेवासे : छापा मारून जप्त केलेल्या वाळूसाठ्यातुन रात्रीच्यावेळी ढंपर व जेसीबीच्या सहाय्याने वाळूचोरी करत असताना रंगेहात पकडल्यावर वाळूतस्करांनी नेवाशाचे तहसीदार उमेश पाटील व महसूल पथकाच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूवाहने पळून नेली. हा प्रकार निंभारी-पाचेगाव रस्त्यावर सोमवार...
ऑगस्ट 07, 2018
मुरबाड (ठाणे) - मुरबाड तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला तहसीलदार, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, वन विभाग कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व विविध मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हा संप पुकारल्याचे  मुरबाड मधिल संपकरी कर्मचाऱ्यानी सांगितले. राज्यातील 22 हजार...
ऑगस्ट 06, 2018
पणजी - बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची तपासणी केली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पाउले उचलता येतात. याच दृष्टिकोनातून राज्यात जन्मणारी पिढी भविष्यातही आरोग्याच्या दृष्टीने सबल व्हावी म्हणून राज्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यात ही...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत. उद्यापासून (ता. 7 ते 9 ऑगस्ट) तीन दिवसांच्या संपावर राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी जाणार आहे.  समन्वय समिती संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. जवळपास 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद,...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 03, 2018
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून इतिहास  घडविला. पण सध्या सुरु असलेल्या आंदोलनात दगडफेक, जाळपोळ सुरु आहे. तरुण आत्महत्या करीत आहेत. याने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. वैधानिक मार्गेनेच हे आरक्षण मिळवावे लागेल. याकरीता एकत्र येवून शासनावर दबाव आणावा लागेल, असा सूर येथे मराठा...
ऑगस्ट 03, 2018
तामिळनाडू : येथील वेल्लूर पोलिसांनी बुधवारी (ता. 1 ऑगस्ट) 45 वर्षीय महिलेला पतीच्या गुप्त अंगावर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. या महिलेचे परपुरुषाशी अनैतिक संबंध होते. याचा सुगावा तिच्या पतीला लागला होता. या जोडप्यात कायम भांडण व्हायचे. या वादातूनच महिलेने हे पाऊल उचलल्याचे कळते.  वेल्लूर...