एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
आंबोली (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसाने चिंचाळा (शास्त्री) येथील घर कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या घरातील पंधरा शेळ्याही जागीच ठार झाल्या. पुयारदंड येथे सोमवारी (ता. 26) सकाळी सात वाजता सखुबाई गावंडे यांच्यावर घराची भिंत...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
एप्रिल 20, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
जुलै 14, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.  आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो....
मे 16, 2018
कुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली.  चौकुळ मळईवाडी येथील पापडी पूल येथे साई आपले वडील शंकर व चुलत भाऊ रूपेश गावडे, सोनू गावडे यांच्या सोबत काल सायंकाळी उशिरा...
मार्च 29, 2018
नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने...
मार्च 21, 2018
मुंबई - दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी 11 जणांना आंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. अन्वरअल हसन शेख, इम्रान शेख, फिरोज अब्दुल माजिद खान अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. आरोपी नागपाडा व अंबरनाथ परिसरातील रहिवासी आहेत. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे; तर इतर आठ...
डिसेंबर 21, 2017
सावंतवाडी - जंगलातून रस्त्यावर धावत येणार्‍या रान डुक्कराने राज्यमार्गावर धावणार्‍या एसटी बसला 'डायरेक्ट' धडक दिली. विशेष म्हणजे यात एसटीच्या पुढच्या भागाचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कारिवडे भोगटेनगर येथे आंबोली सावंतवाडी रस्त्यावर घडली...
नोव्हेंबर 16, 2017
ती खारदुंगला सायकलवरून गेली होती. आता कन्याकुमारीला निघाली. मोपेडवरून. बारा वर्षांची मुलगी पाठीला बांधून ती भटकंतीला निघाली. अवघ्या आठ दिवसांत पाच राज्यांत भटकून आली. हम दोनोंने मिलके कुछ तुफानी किया है, पहले ना कभी हुआ है, ना कभी होगा। मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है।.. हो, मन्वा आणि...
नोव्हेंबर 10, 2017
मिरज - सांगली पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मारहाणीचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात आज (शुक्रवार ) उत्तरीय तपासणी करण्यात आली.तीन वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगलीच्या महिला न्यायाधीश श्रीमती खापे यांच्या उपस्थितीत हि तपासणी केली. तत्पूर्वी मृतदेह अनिकेतचा भाऊ आशिष याला...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी  -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...
ऑगस्ट 06, 2017
आंबोली - येथील कावळेसाद दरीत पडलेल्या इम्रान गारदी (वय २६, रा. भडगाव, गडहिंग्लज) याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आज सहाव्या दिवशी यश आले. बाबल अल्मेडा टीम आणि लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र रेस्क्‍यू टीमच्या युवकांनी आज दुपारी ही मोहीम यशस्वी केली. सहा दिवस वाट पाहणाऱ्या नातवाईकांच्या...
ऑगस्ट 05, 2017
आंबोली - अथक प्रयत्नांनंतर आज पाचव्या दिवशी येथील कावळेसादजवळ खोल दरीत कोसळलेल्या दोघांपैकी प्रताप उजगरे या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. इम्रान गारदीच्या मृतदेहाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. उद्या (ता. 5) पुन्हा बाबल अल्मेडा टीमच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येईल. कडा उंच...
ऑगस्ट 02, 2017
आंबोली - कावळेसाद पॉइंटजवळ दरीत कोसळलेल्या गडहिंग्लजमधील दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी दिसला, मात्र धुके आणि उशीर झाल्याने तो बुधवारी (ता.2) बाहेर काढण्यात येणार आहे. दुसऱ्याचा शोध उद्याच्या शोध मोहिमेत दरीच्या खालच्या बाजूने घेतला जाणार आहे. प्रताप राठोड (वय 21, मूळ रा....
जुलै 19, 2017
अनेक गावांचा संपर्क तुटला - कुडाळ-आंबेडकरनगरला पुराचा वेढा सिंधुदुर्गनगरी - मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. महामार्गावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली. कुडाळमध्ये आंबेडकरनगरला पुराच्या पाण्याने वेढले. दोडामार्गसह सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अनेक गावांचा संपर्क...
जुलै 14, 2017
प्लास्टीक सर्जरी ः दहा वर्षापासून सांभाळतेय भाजल्याचे व्रण सावंतवाडी: अंगावर दिवा पडून वयाच्या सातव्या वर्षी गंभीररीत्या भाजलेल्या कुंभवडे येथील त्या लेकीला आता पुन्हा एकदा मदतीची गरज आहे. सुनिता महादेव कांबळे (वय 17) असे तिचे नाव आहे. तिच्यावर प्लास्टीक सर्जरी करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील...
जून 19, 2017
चौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला आंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज...
फेब्रुवारी 22, 2017
सावंतवाडी - तालुक्‍यात झालेल्या मतदान प्रक्रियेला आज सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणाचा कल नेमका कोठे आहे, हे सांगणे कठीण होणार आहे. शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपल्या उमेदवाराला फायदा व्हावा, यासाठी राजकीय पक्षांचे नेते ग्रामीण भागात ठाण मांडून होते. तर काही मतदारांना प्रोत्साहित...
नोव्हेंबर 19, 2016
वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा...