एकूण 32 परिणाम
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
एप्रिल 18, 2019
रमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्‍य केवळ पेन्सिलीच्या हलक्‍याशा फटकाऱ्यानिशी साकारायचे कसब कोल्हापूरातल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूरतल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूर...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - पिण्याची पाण्याची धोक्‍याची घंटा आता पुन्हा वाजली आहे. २०२५-३० दरम्यान कोल्हापूर, महाराष्ट्र नव्हे, तर देशपातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अहवाल ‘युनायटेड नेशन’ने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार जगभरातील पिण्याच्या पाण्यापैकी केवळ चार टक्के वापर...
मार्च 06, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन तसेच संरक्षक दगडी भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.  शहरवासीयांचा श्‍वास असलेल्या रंकाळा...
सप्टेंबर 04, 2018
जळगाव ः मराठी प्रतिष्ठान व महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खानदेशच्या वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतला असून, अडीच हजार किलो वांग्याचे भरीत तयार करून गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठीचा विक्रम 21 डिसेंबरला केला जाईल, अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील...
ऑगस्ट 31, 2018
पुणे - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) आयोजित केलेल्या ‘यिन फेस्ट’मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत शुक्रवारी (ता. ३१) सकाळी कर्वेनगरमधील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन येथे होणाऱ्या संवाद सत्रात डिझाइन...
जुलै 30, 2018
कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  खासदार महाडिक म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांचे प्रणेते आणि समतेचे पुरस्कर्ते...
जुलै 12, 2018
कोल्हापूर - ते आले, त्यांनी पाहिलं आणि सूचना देऊन निघून गेले, या पारंपरिक विभागीय क्रीडा संकुलाच्या नाट्य प्रयोगाला आता ब्रेक मिळणार का, असा प्रश्‍न क्रीडाप्रेमींतून आज उपस्थित झाला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी क्रीडा संकुलातील अपुऱ्या कामांबाबत क्रीडाधिकाऱ्यांना शाब्दिक डोस जरूर दिला....
डिसेंबर 15, 2017
कोल्हापूर - वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार हा प्लॉट दक्षिणाभिमुख, व्याघ्रमुखी. अशा प्लॉटमध्ये घर बांधणे म्हणजे आयुष्यभर कटकट मागे लावून घेणे. असा काही वास्तुशास्त्रज्ञांनी इशाराच दिला होता. त्यामुळे हा प्लॉट बरीच वर्षे पडून होता. प्लॉट विकत घ्यायला कोण तयारच होत नव्हता... पण कोल्हापूर हे असे एक...
ऑक्टोबर 30, 2017
राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे येथील हौशी कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ. अनेक अडचणींचा सामना करीत कोल्हापूर केंद्र सुरू करण्यात यश आलं आणि याच केंद्राने हाउसफुल्ल स्पर्धा कशी असते, याची प्रचीती संपूर्ण राज्याला दिली. यंदाच्या स्पर्धेचे बिगुल वाजले असून, ६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ होईल. यंदाच्या...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  शून्य ते २०० चौरस मीटरपर्यंतच्या सर्व बांधकामांना मंजुरी देण्याचे काम हे स्थानिक आर्किटेक्‍टस्‌ना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २२ ऑगस्टला मंजूर केलेल्या अध्यादेशाद्वारे दिले; मात्र या अध्यादेशाची महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील अन्य महापालिकांनी अंमलबजावणीस...
जुलै 17, 2017
कोल्हापूर - शिशे के घरो में रहनेवाले दुसरो पर पत्थर नहीं फेका करते. चिनॉय शेठ. बी. आर. चोप्रा यांच्या "वक्त' चित्रपटातील हा डायलॉग हातात विशिष्ट स्टाईलने धरलेला पाईप ओढत राजकुमार म्हणतो तेव्हा चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पडतो; मात्र चित्रपटातील "शिशे के घरो में'ची हीच गोष्ट आज वास्तवात उतरली आहे...
जुलै 15, 2017
वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
जून 16, 2017
कोल्हापूर - उतरते कौलारू छप्पर, शेणा-मातीच्या भिंती, सारवलेले अंगण, अंगणात बसायला कट्टा, समोर तुळशी वृंदावन, हमखास फुललेली एखादी जास्वंदी असा निसर्गाचाच एक घटक वाटणारी पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी एक लोकचळवळ उभी राहणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरहद्दीवर पश्‍चिम घाटात गर्द झाडीत छोट्या...
जून 03, 2017
कोल्हापूर : घर बांधायचं किंवा एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं की, पहिल्यांदा बांधकामामध्ये येणारे झाड तोडण्यावरच बहुतेकांचा भर असतो. कधी गुपचूप तर कधी परवानगी घेऊन युद्धपातळीवर झाड हटवण्यासाठी आटापिटा केला जातो. पण बांधकामाच्या जागेतच मध्ये एक मोठे वडाचे झाड असताना त्या झाडाला केंद्रस्थानी ठेवूनच...