एकूण 16 परिणाम
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जानेवारी 28, 2018
वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...
डिसेंबर 10, 2017
क्रिकेट खेळाडूंनी मास्क लावून खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग दिल्लीत घडला असला, तरी दिल्लीसारखाच जगातल्या अनेक शहरांचा श्‍वास घुसमटलेला आहे. काय आहेत त्याची कारणं, काय करायला हवं, कोणते प्रयोग करायला हवेत आदी गोष्टींवर नजर. कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क...
नोव्हेंबर 10, 2017
मानवी इतिहासात वर्तमान सर्वाधिक गतिमान झाले आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सर्व पातळ्यांवर उत्थान - पतनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया दृश्‍य - अदृश्‍य दोन्ही रूपात चाललेली असल्याने जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये उलथापालथ होतेय. या उलथापालथीत अनेक घडामोडी घडताहेत. त्यातील अनेक गोष्टी...
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
मे 21, 2017
रस्ते आणि त्यांच्यावरची वाहतूक हा सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे, म्हणूनच १९५२ मध्ये दिल्ली इथं केंद्रीय रस्तेसंशोधन संस्थेची (सीआरआरआय) स्थापना करण्यात आली. गुणवत्तापूर्ण, दीर्घकाळ टिकणारे, सुरक्षित आणि परिपूर्ण क्षमतेनं वाहतूक करणारे रस्ते निर्माण...
मे 14, 2017
‘येत्या १०० वर्षांत मानवप्राण्याचा सर्वनाश होणार आहे,’ असा इशारा देत ‘या सर्वनाशापासून बचावासाठी आणि तगून राहण्यासाठी मानवानं पृथ्वी सोडून परग्रहांवर वस्ती करावी,’ असं स्टीफन हॉकिंग यांनी सुचवलं आहे. बीबीसी या वाहिनीवर होत असलेल्या एका चर्चासत्रात त्यांनी ही सूचना केली आहे. हॉकिंग हे ख्यातनाम...
मार्च 12, 2017
अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 12, 2017
मॅपल आणि डॉन कांचीपुरम या दोन मालवाहू जहाजांची तमिळनाडूतील चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या कामराजर बंदरात नुकतीच टक्कर झाली आणि त्यानंतर डॉन कांचीपुरम जहाजाला भेग पडून मोठी तेलगळती सुरू झाली. या तेलगळतीमुळं तेलतवंग समुद्रात आणि किनाऱ्यावर सर्वत्र पसरण्याचा मोठा फटका जवळच्या अनेक पुळणींना बसला आहे. अशा...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
डिसेंबर 25, 2016
कच्च्या तेलाच्या दरांची पुन्हा एकदा ‘चढती भाजणी’ सुरू झाली आहे. एकीकडं कच्च्या तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रतिबिंब तेलाच्या दरांवर पडत आहे. तेलाच्या दरांच्या...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...