एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
अग्नी पेटत राहण्यासाठी त्यात इंधन टाकत राहणे गरजेचे असते, तसेच शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या फराळाची योजना केलेली असावी. सर्वांना आवडतील असे रुचकर, तरीही आरोग्यपूरक पदार्थ अशा या दीपावलीत करायचे ठरविले तर उत्सवाचा आनंद अजूनच वृद्धिंगत होईल. ...
जून 18, 2019
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
डिसेंबर 07, 2018
‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ असे म्हटलेले आहे म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते. हे अन्न उत्तम गुणवत्तेचे, उत्तम वीर्यशक्‍तीचे असण्यासाठी एकूणच वृक्षसंवर्धन, बागबगीचे, शेती यांचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्‍यक असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित अशा प्रकारे शेती केली तरच...
नोव्हेंबर 02, 2018
अंधार भीती उत्पन्न करतो, मनाला गोंधळात टाकणारा असतो, दिशांबद्दल अज्ञान उत्पन्न करणारा असतो; तसेच थकवणारा, ग्लानी आणणारा असतो. याच्या विरुद्ध प्रकाश भीती घालवतो, आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान करून देतो, उत्साह आणि स्फूर्तिदायक असतो. दीपावली हा तर प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे अगोदर ग्रीष्म, नंतर...
नोव्हेंबर 10, 2017
हिवाळ्याचे स्वागत दीपावलीच्या शुभ उत्सवाने होत असते. दीपावलीच्या निमित्ताने लावलेल्या आरोग्यसवयी नंतरही चालू ठेवल्या तर संपूर्ण हिवाळा, इतकेच नाही तर पुढचे संपूर्ण वर्षसुद्धा आरोग्याने परिपूर्ण होऊ शकते. वातावरण जसजसे थंड होते, तसतसा हवेतील कोरडेपणा वाढणे स्वाभाविक असते. थंडीपासून संरक्षण मिळावे,...
ऑक्टोबर 20, 2017
दीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. दीपावलीत प्रकाश व तेजाच्या सान्निध्यात राहण्याने शरीरस्थ अग्नीला चेतना मिळणे सोपे होते. प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करताना, तिला साजेशी...
एप्रिल 07, 2017
"अग्निं रक्षेत्‌ प्रयत्नतः' म्हणजे अग्नीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितलेले आहे. कारण आरोग्य किंवा अनारोग्य हे प्रामुख्याने जाठराग्नीवर अवलंबून असते असे दिसते. सेवन केलेला आहार जाठराग्नीने व्यवस्थित पचवला तर त्यातून आरोग्याचा लाभ होतो, पण जर आहाराचे नीट पचन झाले नाही तर...
फेब्रुवारी 17, 2017
"रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ' म्हणजे मंदावलेला अग्नी सर्व रोगांचे कारण असतो. म्हणून आरोग्य कायम राहण्यासाठी तसेच रोग होऊ नयेत, यासाठी अग्नीला संतुलित ठेवणे अपरिहार्य असते. अग्नी आहारसापेक्ष असतो म्हणजे आहार अनुकूल असला तर अग्नीसुद्धा कार्यक्षम राहतो, याउलट आहारात दोष असला तर त्याचा भुर्दंड अग्नीला...
डिसेंबर 23, 2016
शरीरात नामनिर्देश करता येतील असे तेरा अग्नी असतात, यापैकी जाठराग्नी हा सर्वांत प्रमुख असून इतर सर्व अग्नींचा आधार असतो. यथास्वेनोष्मणेति पृथिव्यादिरुपाशितादेर्यस्य य ऊष्मा पार्थिवाग्न्यादिरुपस्तेन ।।....चरक सूत्रस्थान चक्रपाणी टीका जाठराग्नी हा सात धातू, सात धात्वग्नी आणि पाच...