एकूण 72 परिणाम
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा,...
मार्च 17, 2019
पिंपरी - नियंत्रण कक्षाने सांगूनही घटनास्थळी वेळेवर न पोचणाऱ्या दहा पोलिस ठाण्यांतील दीडशे पोलिसांना शनिवारी पोलिस आयुक्‍तांनी भर उन्हात परेड करायला लावली. तसेच, या पोलिसांवर देखरेखीच्या नावाखाली वरिष्ठ निरीक्षकांना उन्हात उभे केले. पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवडाभरात चौथ्यांदा अशाप्रकारे परेडची...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड औद्योगिक...
फेब्रुवारी 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा करायचा, असा...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. ...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने लावण्यात येत असून, वाहनचालक व इतर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. या जागेवर अतिक्रमण होत असूनही प्राधिकरणाच्या...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण वेगात सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त होत असून, त्यांच्या सौंदर्यात भरही पडणार आहे.  शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीचा विस्तार झालेला आहे. भोसरी ते निगडी टेल्को रस्ता...
नोव्हेंबर 16, 2018
पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने वारकरी व भाविकांचीही सोय होणार आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथे सुमारे ६५० मीटर लांबीचा आणि...
ऑक्टोबर 26, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत असून, सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपार व महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. परिमंडल एकमधील दहा जणांना तडीपार...
ऑक्टोबर 24, 2018
पिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी प्राधिकरण परिसरात आता २२ मजली टॉवर उभे राहणार आहेत. प्राधिकरण क्षेत्रात पूर्वी ३६ मीटर उंचीपर्यंत (अकरा मजल्यांपर्यंत) बांधकाम...
ऑक्टोबर 11, 2018
पिंपरी - महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यम उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मिळणाऱ्या रेड कार्पेट सुविधांमुळे शहरातल्या सुमारे १०० उद्योगांनी गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास पसंती दिल्याचे समोर आले आहे. शहरातील लघुउद्योजकांसमोरील आव्हाने या विषयावर ‘कॉफी विथ सकाळ’ या...
ऑक्टोबर 04, 2018
भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.   एमआयडीसीतील इंद्रायणी चौक, संकेत हॉटेल ते यशवंतराव चव्हाण चौक, संपूर्ण एफ-२...
ऑक्टोबर 02, 2018
चिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या कुत्र्यांची भीती, त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अग्निशामक केंद्र असल्याचा फ्लेक्‍स फाटल्याने ते शोधूनही सापडत नाही. सुविधांचा अभाव असलेले हे...
सप्टेंबर 30, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ये-जा करण्यासाठी बस, रिक्षाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी प्रथमच ऍप बेस्ड शेअरिंग सायकलचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन...
सप्टेंबर 07, 2018
पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा...
सप्टेंबर 06, 2018
हिंजवडी - हिंजवडी आयटी पार्कच्या वाहतूक कोंडीची कारणे व त्यावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी एमआयडीसी, ग्रामस्थ, आयटीयन्स व पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ५) दुपारी येथील रस्त्यांची व कोंडी होत असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. रस्त्यांवरील अतिक्रमणे व खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होऊन...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीच्या निविदेला मान्यता देऊन तो कार्यकारी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कार्यकारी समितीची मान्यता...
ऑगस्ट 20, 2018
पिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिले आहेत. एका पथकात किमान आठ जण असणार आहेत. मनुष्यबळानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक तयार केले आहे....
ऑगस्ट 14, 2018
भोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदूषण...