एकूण 155 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली.  गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन, सिडको) यांनी...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
सप्टेंबर 18, 2019
"महावितरण'च्या अधिकाऱ्याला  मारहाण; कार्यालयात तोडफोड  जळगाव : वसंतवाडी (ता. जळगाव) येथे वीजपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या वसंतवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरण सबस्टेशनच्या अधिकाऱ्याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी...
सप्टेंबर 14, 2019
डोंगर पोखरून मुरूम उपसा; बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाची चर्चा   आंबेठाण (पुणे) : चाकण एमआयडीसीतील मोकळ्या जागा पोखरल्यानंतर मुरूम माफियांनी आपला मोर्चा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भामचंद्र डोंगराकडे वळविला आहे. यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त होत असून, महसूल प्रशासन झोपले की काय, असा सवाल...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक : सिटी सेंटर मॉल-गोविंदनगर रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकी संरक्षण भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर, दुसऱ्या घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस चौकीसमोर आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत तरुण दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका व अंबड पोलिसात अपघाताचे...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : जागतिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी जागतिक संघाकडून निवड केलेल्या नवी मुंबई शहराच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज कोलमडले आहे. अद्ययावत संपर्क यंत्रणा, पुरेशा मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग स्वतःच आपत्तीत सापडले आहे. त्यामुळे शहरावर अचानकपणे मोठी...
सप्टेंबर 03, 2019
केमिकल कंपन्यांमध्ये स्फोट, कामगारांचा होरपळून मृत्यू, अशा काही घटना राज्य सरकारला ठाऊक नाहीत, असे नाही. औटघटकेच्या चौकशीच्या नावाखाली अशा घटना दुर्लक्षित केल्या जातात. शिरपूर तालुक्‍यातील रहिवास क्षेत्रात असलेल्या केमिकल कंपनीत झालेला स्फोट हा बेफिकिरीचाच परिपाक. अशा दुर्घटना घडतात, तेव्हा...
ऑगस्ट 23, 2019
सोलापूर : मंदीचा फटका बसण्याचे लोण आता सोलापूरच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. येथील प्रिसिजन, बालाजी अमाईन्स, पारले या कंपन्यांसह वस्त्रोद्योगही मंदीमुळे अडचणीत आला आहे. उत्पादनांना उठाव नसल्याने उद्योग तोट्यात आले आहेत. यामुळे उत्पादन बंदसह कामगार कपातीचे धोरण कंपन्यांना राबवावे लागण्याचे संकेत...
ऑगस्ट 22, 2019
जळगाव ः जळगाव उपविभागातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या आठवडाभरापासून सतत घरफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रत्येक पोलिस ठाण्यातून केवळ ठराविक व मोजक्‍याच कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी असते. उर्वरित कर्मचाऱ्यांना रात्रपाळी अथवा गस्तीची सक्तीच नसल्याची ओरड आता होऊ लागली आहे. साहेबांच्या...
ऑगस्ट 13, 2019
पिंपरी : "आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाचा अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागला....
ऑगस्ट 07, 2019
महाडमध्ये पूरभय  महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले असून मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शहराला चहूबाजूने पुराचा वेढा होता. हे पाणी बुधवारी सकाळी ओसरले असले, तरीही महाडकर भीतीच्या छायेत आहेत. तालुक्‍यातील सरकारी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 27, 2019
जळगाव : महाराष्ट्रात नक्षल प्रभावित डोंगराळ आणि दुर्गम भागात चंद्रपूर, गडचिरोली, मेळघाटात आतापर्यंत गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र, पारंपरिक शेतीतून येणारा कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, रोखीचे उत्पन्न देणाऱ्या पिकांचे नुकसान यामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती डोंगराळ प्रदेशात...
जुलै 25, 2019
रत्नागिरी - प्रदूषणाच्या मुद्द्यावरून विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच रत्नागिरीत विविध उद्योग सुरू करण्यासाठी वाटद येथे औद्योगिक विकास (एमआयडीसी) प्रकल्प उभारण्यासाठी 998 हेक्‍टर जागेच्या भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे. जागा संपादित करण्याचे आदेश भूसंपादन विभागाचे...
जुलै 23, 2019
औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...
जुलै 16, 2019
नागपूर : राज्य सरकार भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 16) बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शोभाताई...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं...