एकूण 50 परिणाम
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
फेब्रुवारी 18, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खेळाची मोठी परंपरा असली तरी महाराष्ट्राच्या खेळाडूने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून दशके लोटली. दोन वर्षांनी टोक्‍योमध्ये होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले तर तो महाराष्ट्राचा खरा सन्मान असेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी छत्रपती पुरस्कार...
जानेवारी 07, 2018
क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या...
ऑक्टोबर 11, 2017
बॅडमिंटन लीग लिलाव - प्रणॉयला ६२, तर श्रीकांतला ५६ लाख हैदराबाद - बॅडमिंटन जगतात भारतीय खेळाडू आपला दबदबा तयार करत आहेत. कमाईतही ते परदेशी खेळाडूंच्या तुलनेत पुढे जात आहेत. बॅडमिंटन लीगसाठी झालेल्या लिलावात एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना सर्वांत भाव मिळाला. महिलांमध्ये अर्थातच पी. व्ही....
ऑक्टोबर 02, 2017
परळ ते एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानके जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुंबईनं परवा 'ब्लॅक फ्रायडे' अनुभवला. चेंगराचेंगरीत तेवीस हकनाक बळी गेले. चाकरमान्यांच्या जुन्याच जखमांवरची खपली निघाली. पुन्हा वेदनांची असह्य ठसठस. मुंबईकरांच्या रागाचा केंद्रबिंदू आहे प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन. देशाचं...
जुलै 14, 2017
पुणे - महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्हा संघटनेचा वरचष्मा राहिला आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेसह पुण्याचा विकास काळे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या स्व. मधुसूदन पाटील पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. कबड्डी महर्षी स्व. बुवा साळवी यांचा जन्म दिन (१५ जुलै...
जून 06, 2017
मुंबई - भारतीय हॉकी संघाने जोरदार आक्रमक खेळ करीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला ३-२ असे पराजित करीत जर्मनीतील तिरंगी हॉकी स्पर्धा जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बेल्जियमला स्पर्धेत ही सलग दुसरी हार पत्करावी लागली, त्यामुळे या स्पर्धेतील रंगत वाढली आहे.  हरमनप्रीतच्या दोन...
मे 25, 2017
मुंबई - ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याविरुद्ध लढत असल्याचा फारसा विचारही केला नाही. केवळ व्यूहरचेनुसार खेळ करण्याचे ठरवले. त्याचबरोबर चुका टाळण्यात यश आल्याचा फायदा झाला, असे अश्‍विनी पोनप्पाने सांगितले. अश्‍विनीने दुहेरीच्या दोन लढती जिंकल्यामुळे भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन...
मे 24, 2017
मुंबई - अश्विनी पोनप्पाने दुहेरीच्या दोन्ही लढती जिंकल्या, त्यापासून प्रेरणा घेत भारताने सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत इंडोनेशियाला ४-१ असे हरवले. इंडोनेशियाने गेल्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते, त्यामुळे भारतासाठी हा विजय मोलाचा आहे. या विजयामुळे भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशाही ...
मे 23, 2017
मुंबई - भारतास सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या साखळी लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ पराभव पत्करावा लागला; पण सिंधूच्या विजयाबरोबरच मिश्र आणि महिला दुहेरीतील कडवी लढत ही भारताची जमेची बाजू ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील वेस्ट कोस्टमधील स्पर्धेत सांघिक लढतीत दुहेरी ही भारताची कायम कमकुवत बाजू...
एप्रिल 28, 2017
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धेस जोरदार सुरवात केलेला अजय जयराम दुसऱ्याच फेरीत पराजित झाला.  चीनमधील वुहान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने जपानच्या...
एप्रिल 15, 2017
उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत...
एप्रिल 14, 2017
ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय  मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल....
एप्रिल 13, 2017
सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मुंबई - रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा कडवा प्रतिकार तसेच स्वतःच्या सदोष खेळावरही सिंधूला मात करावी लागली. इंडिया ओपन...
एप्रिल 12, 2017
मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे. कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे. लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत...
एप्रिल 06, 2017
धोका पत्करणार नसल्याची मार्गदर्शक नंदी यांची ग्वाही मुंबई - गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसही मुकण्याची दाट शक्‍यता आहे. आम्ही पुनरागमनाची कोणतीही घाई करणार नाही. प्रसंगी जागतिक स्पर्धेसही दीपास मुकावे लागेल, असे तिचे मार्गदर्शक बिश्‍...
एप्रिल 05, 2017
पुनर्वसन प्रक्रिया सुरू; सराव सुरू करण्यास दोन महिने लागणार मुंबई - भारतीय जिम्नॅस्टिकचा चेहरा झालेल्या दीपा कर्माकर हिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या गुडघ्यावरील पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तिला पुन्हा जिम्नॅस्टिकचा सराव सुरू करण्यास किमान दोन महिने लागतील, असे...
एप्रिल 04, 2017
मुंबई - इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळी जागतिक क्रमवारीत पाचवी असलेली पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत दुसरी असेल, तसेच या क्रमवारीत ती ऑलिंपिकविजेत्या कॅरोलीन मरिन हिलाही मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सुपर सीरिज विजेतेपदासाठी 9 हजार 200 गुण देण्यात येतात, तर उपविजेत्यास...
एप्रिल 01, 2017
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकामुळे सिंधूचा खेळ किती बदलला आणि प्रतिकूल परिस्थितीतही तिचा आत्मविश्वास डगमगत नाही, हेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या साईना नेहवालविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिसले. दुसऱ्या गेममध्ये अनेकदा तीन गुणांनी पिछाडीवर पडल्यावरही सिंधू डगमगली नाही....