एकूण 52 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले. ...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली. भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमपेक्षा सरस कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे आव्हान लीलया परतवताना 5-0 असा सफाईदार विजय मिळवला.  सविस्तर...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
ऑगस्ट 20, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघांना अव्वल...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली- ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सुवर्णकाळ अनुभवला होता हा इतिहास असला तरी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक भारताने 12 ऑगस्ट 1948च्या स्पर्धेत मिळविले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनदिनी देशाला सुवर्णभेट दिली यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्टच असू शकत...
ऑगस्ट 12, 2018
‘एनर्जी ऑफ एशिया’ हे आठवडाभरात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे बोधवाक्‍य आहे. भारतीयांनी हे वाक्‍य जणू खूपच मनावर घेतले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय पथकनिवडीसाठी जणू प्रत्येकाने आपली ताकद पणास लावली आणि भारतीय पथक नेमके किती सदस्यांचे हा प्रश्‍न सततच भेडसावत राहिला....
जुलै 23, 2018
लंडन / मुंबई-  भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली.  विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला रोखेल, अशी कट्टर...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. हॉकी खेळाडूंची निवड "खेलो इंडिया' गुणवत्ता प्रसार कार्यक्रमांतर्गत होणार असेल, तर त्याला आमची मान्यता नसेल, असे "आयओए' अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सोमवारी सांगितले.  राष्ट्रीय...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय...
मे 02, 2018
नवी दिल्ली - आठ महिन्यांतच हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदांचे पत्ते पिसले आहेत आणि त्यात हरेंद्रसिंग यांच्याकडे पुरुष संघाची जबाबदारी आली आहे. गतवर्षी 8 सप्टेंबरला पुरुष संघाऐवजी महिला संघाची सूत्रे दिल्याने हरेंद्रसिंग नाराज होते. ते प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार नव्हते. आता 1 मे रोजी हरेंद्र यांनी...
एप्रिल 30, 2018
मुंबई - भारतीय कुमार संघाने युवा ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या अंतिम लढतीत अखेरच्या सेकंदात गोल स्वीकारला, पण गोलरक्षक प्रशांत चौहानने शूटआउटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे भारताने विजेतेपद पटकावले.  बॅंकॉकला झालेल्या या स्पर्धेत भारतीय मुलींना चीनविरुद्धच्या अंतिम...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट / मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ‘नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल भारतावर होणारी कठोर कारवाई टळली आहे. भारतीय बॉक्‍सरला ‘व्हिटॅमिन बी’चे इंजेक्‍शन देणारे डॉ. अमोल पाटील यांना लेखी ताकीद देऊन हे प्रकरण अखेर निकालात काढण्यात आले. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या सहभागाचा...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 21, 2018
मुंबई - पुनरागमनाची संधी देत सरदार सिंगला सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी थेट कर्णधार करण्यात आले आहे. अर्थात, त्यानंतरही महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळी त्याला स्थान मिळण्याची शक्‍यता धूसरच असल्याचे संकेत मिळत आहेत.  जागतिक हॉकी लीगचा अंतिम टप्पा; तसेच न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळी सरदारला ब्रेक...
फेब्रुवारी 13, 2018
पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा...
जानेवारी 29, 2018
मुंबई - भारतीय आक्रमकांनी बेल्जियमचा बचाव भेदला; पण ऑलिंपिक उपविजेत्यांनी न कोलमडता जोरदार प्रतिकार केला. बेल्जियमने अखेर पेनल्टी शूटआउटवर बाजी मारत चौरंगी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातही भारतास विजेतेपदापासून वंचित ठेवले. हॅमिल्टनला झालेल्या निर्णायक लढतीत निर्धारित वेळेत भारताने...
जानेवारी 22, 2018
मुंबई - ऑलिंपिक उपविजेते बेल्जियम घालत असलेले कोडे सोडवण्यास भारतास चौरंगी हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीतही अपयश आले. न्यूझीलंडमधील या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत भारतास १-२ अशा पराभवास सामोरे जावे लागले.  गेल्या काही महिन्यांतील माफक अपवाद सोडल्यास भारत बेल्जियम लढतीत फारसे वेगळे काही...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली - हरमनप्रीत, दिलप्रीत आणि मनदीप यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने यजमान न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव करून चार राष्ट्रांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा ब्लेक पार्क, तौरंगा येथे सुरू आहे. उद्या होणाऱ्या विजेतेपदासाठी ऑलिंपिक रौप्य विजेते बेल्जियम...