एकूण 100 परिणाम
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून...
मे 10, 2019
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले असून कचऱ्यावर प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. महापालिका बायोमाईनिंगद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे. परंतु, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महापालिकेचे अधिकारीच साशंक असून त्यांच्यापुढे दररोज...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - घरोघरीचा कचरा गोळा करून आणि कचरानिर्मितीच्या ठिकाणीच खत तयार करण्याचा पालिकेचा प्रयोग यशस्वी होत आहे. तुर्भे येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील पहिला खतकुंडीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. यात साधारण दोन हजार घरांमागे एक टन कचऱ्यापासून खड्ड्यात खतनिर्मिती केली आहे. ते खत स्वयंसेवी...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
फेब्रुवारी 26, 2019
गडहिंग्लज - केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अभियानातील कचरामुक्त शहरामध्ये गडहिंग्लज शहराचा समावेश झाला आहे. राज्यातील 40 शहरांमध्ये गडहिंग्लजने पटकावलेले स्थान गौरवास्पद असल्याचे मत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी व्यक्त केले. 6 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद -शहरातील कचराकोंडीला वर्षपूर्ती झाल्यानंतरही महापालिकेचे प्रयोग सुरूच आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या "डीपीआर'मध्ये (प्रकल्प व्यवस्थापन अहवाल) अनेक त्रुटी राहिल्याचे समोर आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू होते. अखेर शुक्रवारी (ता. 22) झालेल्या सर्वसाधारण सभेत...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने वर्षभरापूर्वी रौद्ररूप धारण केले होते. तब्बल 35 वर्षांपासून शहराचा कचरा सहन करणाऱ्या नारेगाव परिसरातील ग्रामस्थांची कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने होत; परंतु काहीतरी सांगून, वेळप्रसंगी बळाचा वापर करून ती आंदोलने दाबली जात होती....
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - सॅनिटरी नॅपकिनमुळे दिवसेंदिवस पर्यावरणासाठी धोका वाढत आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. न्यू पॅलेस परिसरातील नैना साळोखे यांनी सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे घरच्या घरी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली....
फेब्रुवारी 15, 2019
शिराळा, जि. सांगली - शिराळा नगरपंचायतीने आश्रमशाळा आणि नाग स्टेडियम परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र युनिट उभारल्याने दररोज अडीच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याचबरोबरीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीस सुरवात झाली आहे. नगर पंचायतीने "स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा'' ही संकल्पना...
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
जानेवारी 24, 2019
पुणे  :  समुद्रातील प्रदुषण कमी करणे व समुद्रीय जीवांचे रक्षण करण्याच्या दृष्टिने एका बारा वर्षीय मुलाने एक जहाजाचे डिझायन बनविले आहे. 'हाझिक काझी' असे या मुलाचे नाव आहे आणि "एर्विस' असे नाव त्याने जहाजाला दिले आहे.  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हाझिकने सांगितले, "मी काही लघुपट पाहिल्यानंतर...
जानेवारी 15, 2019
नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.  २७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात...
नोव्हेंबर 26, 2018
बारामती शहर - शहरातील अशोकनगर भागात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. येथे नगरपालिकेने जबरदस्तीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.  काल या भागातील रहिवाशांची बैठक झाली, त्यात आरोग्य निरिक्षक...
नोव्हेंबर 13, 2018
सातारा - सातारा नगरपालिकेने जमा केलेला कचरा गेली चार दशके सोनगाव डेपोत टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे ठोस धोरण अद्यापपर्यंत अंमलात आलेले नाही. त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडीतील ग्रामस्थ सहन करत आहेत. कालपासून (ता.11) या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील...