एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
जुलै 16, 2018
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षी कडधान्यांच्या पेरणीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या आठवडाअखेरीस एकूण कडधान्यांचा ६०.५ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर, मुगाचा पेरा पिछाडीवर तर उडदाचा पेरा आघाडीवर आहे. पंचवार्षिक सरासरीनुसार...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
जुलै 06, 2018
येवला : केंद्र सरकारने कडधान्याच्या आधारभूत किंमतीत दीडपट वाढ करून वाढीव किमती घोषित केल्या आहेत. मात्र,उत्पादित शेतमालाची परिपूर्ण खरेदी होत नसल्याने ७० टक्के शेतकऱ्यांना व्यापऱ्यांच्या दारात शेतमाल नेऊन टाकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल सरसकट खरेदी केलाच तरच आधारभूत किंमतीचा...
जून 05, 2018
अमरावती - शेतकऱ्यांच्या घरांत अद्याप दहा लाख क्विंटल तूर व हरभरा पडून असण्याची शक्‍यता सरकारी सूत्रांनी वर्तविली. यासंदर्भात मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे यंत्रणेचे लक्ष लागून आहे.  जिल्ह्यात तूरखरेदीसाठी एकूण ७० हजार १९७ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली होती;...
एप्रिल 19, 2018
राज्यातली तूर खरेदी गोदामांअभावी अडू नये म्हणून बाजार समित्यांच्या अखत्यारीत असलेली गोदामे आणि खासगी गोदामे ताब्यात घेण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तूर खरेदी सुरू झाली एक फेब्रुवारीला. ती ९० दिवसांत पूर्ण करावी लागते. ही मुदत संपायला फक्त १३ दिवस उरलेले असताना...
मार्च 01, 2018
पुणे  - दर गडगडल्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज, मध्य प्रदेशात भावांतर योजना राबवण्याचा निर्णय आणि घटलेली मागणी यामुळे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. राज्य सरकारने एक मार्चपासून `नाफेड`च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भाषा करत असताना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सध्याचा हमीभावही पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तुरीची विक्री हमीभावापेक्षा सुमारे २५ टक्के कमी दरात...
फेब्रुवारी 07, 2018
नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर...
जानेवारी 24, 2018
मुंबई - महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर उत्पादक राज्य आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात; परंतु तूर एकदा बाजारात आली की दर पडतात. यंदाही तोच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. हमीभाव ५४५० असताना बाजारात मात्र तूर ३८०० रुपयांपासून खरेदी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आठ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशाच्या नकाशावर नजर टाकल्यास शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा देशात सर्वांत  वरचा क्रमाक असल्याची माहिती विधान परिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी आज येथे दिली.  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
डिसेंबर 04, 2017
सोयातेल आयातीवरील शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी हा निर्णय घेण्यास खूप उशीर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञ व विश्लेषकांचे मत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन...
नोव्हेंबर 29, 2017
सांगली - शासनाने हमीभावाने कडधान्य खरेदी केंद्र सुरू केली. मात्र जाचक नियम लावून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. हेक्‍टरी क्विंटलचे प्रमाण ठरल्याने जास्तीचे उत्पादन घरी न्यायचे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने धोरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदीड...
नोव्हेंबर 22, 2017
शेतकऱ्यांमधील असंतोषाचा मोठा उद्रेक होण्याआधीच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तातडीने घ्यायला हवी. देशभरातील शेतकऱ्यांच्या मोर्चाने त्याची जाणीव करून दिली आहे. "पद्मावती' चित्रपटावरून देशभर काहूर, अभिव्यक्‍ती व अस्मितेच्या मुद्यावर वाद-प्रतिवादांचा कोलाहल...
नोव्हेंबर 20, 2017
हरभरा, मसूरसहीत सर्वच कडधान्यांवरील निर्यातबंदी उठविणे आणि खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ हे केंद्र सरकारचे निर्णय स्वागतार्ह आहेत. बाजारावर त्याचा लगेचच मोठा परिणाम दिसणार नसला तरी दीर्घ कालावधीच्या दृष्टीने निश्चितच हे निर्णय फायदेशीर ठरतील, असे मत लातूर येथील व्यापारी व निर्यातदार नितीन कलंत्री...