एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
स्वतःलाही वेळ द्या. हाडे व स्नायू बळकट करा. सांध्यांचा वापर करा. चौरस आहार व पुरेसा व्यायाम यातील नियमितता आपली हाडे, स्नायू, सांधे यांची काळजी घेईल.  हाड म्हणजे आपल्या शरीराचा सांगाडा म्हणजेच ‘स्ट्रक्‍चरल सिस्टीम.’ आपण जशी इमारतीची स्ट्रक्‍चरल सिस्टीम पाहतो, की ती खूप चांगली असेल तर ती...
सप्टेंबर 20, 2019
मटार पथ्यकर आहारात विशेष बसत नाही. ज्यांची पचनशक्‍ती उत्तम आहे, म्हणजे ज्यांना भूक नीट लागते, जे भरपूर व्यायाम करतात, ज्यांना कधीच अपचन होत नाही त्यांना अधून मधून मटार किंवा वाटाणा सेवन करण्यास हरकत नसावी. ज्यांना भूक चांगली लागते, पण वजन भरत नाही त्यांनी ताज्या गावरान मटाराच्या शेंगा भाजून घेऊन...
ऑगस्ट 30, 2019
निरोगी व्यक्‍तींसाठी मूग, तूर, मटकी, मसूर, कुळीथ ही कडधान्ये अनुकूल असतात. यांचे वरण, आमटी, कढण, उसळ असे पदार्थ बनवता येतात. मुगाचे किंवा तुरीचे वरण किंवा आमटी रोज आहारात ठेवली तरी चालते. आठवड्यातून दोन वेळा मुगाची उसळ, एका कुळीथ, एकदा मटकी व एकदा मसूर याप्रकारे उसळही करता येते.  येथे आपण मसूर व...
ऑगस्ट 09, 2019
चवळी चविष्ट असते, परंतु वात वाढविणारी असल्याने रोजच्या खाण्यात योग्य नसते. तरुण मंडळी, लहान मुले, प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींनी अधूनमधून चवळीची उसळ खाण्यास हरकत नसते. आम्लपित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी थोड्या प्रमाणात चवळीचा आहारात समावेश करणे चांगले. मात्र वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी चवळी तितकीशी...
जून 18, 2019
आपल्या शरीराला कोणता आहार आवश्‍यक आहे, तसेच योग्य आहे हे जाणायला हवे. एकूण बारा वर्गांमध्ये आहारद्रव्यांचे विभाजन केले आहे.   चरकाचार्यांनी अन्नपानविधी या अध्यायात आहाराची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी आहारद्रव्यांचे एकूण बारा वर्गांमध्ये विभाजन केलेले आहे व प्रत्येक वर्गातील द्रव्यांचे...
एप्रिल 20, 2018
‘रामबाण औषध’ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. शंभर टक्के लागू पडेल असे औषध म्हणजे रामबाण औषध. औषध लागू पडणे ही पुढची अवस्था असते, त्यापूर्वी औषधाची रामबाण योजना होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अग्र्यसंग्रह कामाला येतो. उपचार असोत, आहारयोजना असो, पंचकर्म असो किंवा मानसिक भाव असो, अग्र्यसंग्रहाला...
एप्रिल 13, 2018
चरकसंहितेतील ‘अग्र्यसंग्रह’ हा एक असा विभाग आहे की जो संपूर्ण आयुर्वेदाचा साररूप आहे असे म्हणता येईल. उपचाराचा किंवा आरोग्यरक्षणाचा नेमका उद्देश एकदा ठरला की, तो अधिकाधिक पूर्ण होण्यासाठी अग्र्यसंग्रहाचा आधार घ्यावाच लागतो. मागच्या वेळी आपण रानहरिख हे शरीरात कोरडेपणा हवा असेल तेव्हा योजना...
फेब्रुवारी 16, 2018
आहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्‍यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो. आरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की....
नोव्हेंबर 03, 2017
ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात ‘रसायन सेवन’ सुचवले आहे.  हिवाळा हा ऋतू सर्वच दृष्टिकोनातून सुखदायक...
सप्टेंबर 08, 2017
दमा बऱ्याच वर्षांपासून असला तर हळूहळू फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. यावर तांदूळ व तीळ एकत्र शिजवून तयार केलेली खिचडी तूप घालून खाण्याने फायदा होतो. जेवणानंतर विड्याचे पान, त्यात ज्येष्ठमध, लवंग, वेलची, दालचिनी, जायपत्री वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून घेण्यानेही फुप्फुसांना शक्‍ती मिळण्यास मदत...
ऑगस्ट 18, 2017
क्षयरोगात धातूंचा क्षय होत असल्याने धातुपोषक आणि पचण्यास सोपा आहार घेणे आवश्‍यक असते. या दृष्टीने क्षयरोगात ताकाबरोबर डाळी शिजवून बनविलेले सूप सुचविलेले आहे. धान्य एक वर्ष जुनी असावीत. पचायला हलके, वीर्यसंपन्न, उत्तम चवीचे आणि सुगंधित अन्न सेवन करावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे अन्न खाण्याने शरीर...
ऑगस्ट 11, 2017
आयुर्वेदिक पाकसंकल्पनेवर आधारलेला आहार आणि औषध यात फार मोठा फरक नसतो. औषधांचा गुण अधिक चांगला यावा यासाठी सुद्धा आहारनियोजन फार महत्त्वाचे असते. आयुर्वेदात रोगानुसार आहार समजावलेला आहे, त्याची आपण माहिती घेतो आहेत. आज आपण ‘रक्‍तपित्त’ या रोगात आहार कसा असायला हवा हे पाहणार आहोत.  नाकाचा घोळणा...
जून 09, 2017
जुलाब होत असताना थकवा येत नाही ना आणि शरीरातील पाणी कमी होत नाही ना याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. हळूहळू भूक लागायला लागली, की शरीरातील आमदोष कमी झाला आहे, हे समजते. त्यानंतर औषधी द्रव्यांनी संस्कारित पाण्यात तांदूळ शिजवून तयार केलेली यवागू, विलेपी, खड, यूष, मांसरस आणि भात या प्रकारे अन्न देणे...
जून 02, 2017
ताप सर्वांच्या परिचयाचा रोग होय. ताप येतो तो एकटा कधीच येत नाही, बरोबरीने कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, कधी सर्दी-खोकला, कधी जुलाब असे अजून कितीतरी त्रास बरोबरीने घेऊन येतो. आयुर्वेदात तापाच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार वेगवेगळी औषधे दिलेली आहेतच; पण त्याबरोबरीने औषधांनी युक्‍त पथ्याहाराच्या...