एकूण 23 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा...
मार्च 17, 2019
बंगळूर - एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असतानाच सर्वच पक्षांत पक्षांतराची लाट सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस, धजदसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही ही डोकेदुखी झाली आहे. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी व बी. नागेंद्र भाजपच्या वाटेवर आहेत; तर भाजपचे प्रदेश...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
ऑक्टोबर 04, 2018
विरोधकांच्या "महागठबंधन" संकल्पनेला तडा जाणाऱ्या घटना घडू लागल्यात. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्यात. गेल्या काही दिवसात वीस ते बावीस पक्ष एका व्यासपीठावर आलेही. त्यांचे, "हातात हात घालून," तर "इंग्रजी "व्ही" चे चिन्ह दर्शविणारी", एकमेकांना अलिंगन देणारी...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
सप्टेंबर 24, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना असलेल्या आरक्षणाबाबत अनेकदा हेटाळणीच्या स्वरूपात बोलले जाते. नवऱ्याचा पक्ष तोच बाईचा पक्ष. महिला सरपंच किंवा नगरसेविका नावालाच असतात, कारभार त्यांच्या पतिराजांच्याच हातात असतो. याच बऱ्याच अंशी तथ्य आहे याची मुळे पारंपरिक पुरुषी...
ऑगस्ट 29, 2017
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी "राष्ट्रीय जनता दला'चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याने भारतीय राजकारणात पुनश्‍च एकवार "महागठबंधना'चा नवा फड उभा राहिला आहे! या फडातील पात्रे तीच होती; मात्र नितीशकुमार यांनी अलीकडेच विरोधी पक्षांशी काडीमोड...
मे 05, 2017
राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न डॉ. राममनोहर लोहिया यांनी...
मार्च 10, 2017
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यातील सत्ता ज्याच्या हाती असेल तो दिल्लीतील सूत्रे हालवू शकतो तथा दिल्लीश्‍वरांना त्यांचे म्हणणे ऐकणे भाग पडते असे म्हटले जाते. आणि ते अनेकदा दिसूनही आले आहे. त्यामुळेच पाच...
जानेवारी 18, 2017
उत्तर प्रदेशात गेले काही महिने ‘नेताजी’ मुलायमसिंह आणि ‘बेटाजी’ अखिलेश यादव यांच्यात सायकलीच्या चिन्हासाठी सुरू असलेल्या ‘दंगली’चा फैसला निवडणूक आयोगाने करताच, केवळ त्या राज्याच्याच नव्हे; तर देशाच्याच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे! खरी ‘समाजवादी पार्टी’ ही अखिलेश यांचीच आहे आणि त्यामुळे त्याच...
जानेवारी 18, 2017
लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्षात अखेर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाल्याने राज्यातील सर्व राजकीय गणितेच बदलली आहेत. या बदलाचा दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला आहे. ताज्या दमाच्या अखिलेश यांच्या सैन्याला तोंड देण्यासाठी भाजप आणि बहुजन समाज पक्षाला आपली रणनीती बदलावी...
जानेवारी 08, 2017
उत्तर प्रदेशातल्या राजकारणात लोकसभेची पुनरावृत्ती भाजपा करणार की मतगठ्ठा शाबूत ठेवलेल्या मायावतींचा बसपा चमत्कार दाखवणार आणि यात मुलायमसिंहांच्या सपाचं काय होईल, यावर केंद्रित असलेलं चर्चाविश्‍व समाजवादी यादवांमधल्या दुफळीनं पुरतं बदलून गेलं आहे. ‘सपा म्हणजे मुलायमसिंह यादव’ हे उत्तर प्रदेशाचं...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 27, 2016
नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील करोलबाग येथील युनियन बॅंकेवर छापा टाकत आनंदकुमार यांच्या खात्यातील 1 कोटी 43 लाख रुपये जप्त केले. आनंदकुमार हे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे भाऊ आहेत. याचसोबत बसपच्या खात्यातील 104 कोटी रुपयेही जप्त केले आहेत. यामुळे मायावती अडचणीत...