एकूण 263 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 19, 2019
‘आरे’च्या परिसरातील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या वादात शिवसेना उतरली आहे; परंतु त्यात पर्यावरणाच्या मुद्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा प्रयत्नच जास्त दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही हुकमाचे पान आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गळामिठी...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 12, 2019
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे. अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत...
सप्टेंबर 09, 2019
इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली - विरोधकांच्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्यात पुन्हा एकदा विघ्न आले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे नेते हे...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड किंवा नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र वर्तमान अध्यक्ष व केंद्रीय...
ऑगस्ट 14, 2019
वाढत्या जागतिक तापमानामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून भविष्यात पृथ्वीचे अनेक टापू माणसाला जगण्यास अयोग्य बनणार आहेत. अशा कोट्यवधी लोकांना स्थलांतरावाचून पर्याय उरणार नाही. परंतु  सध्या माणसांनी केलेले कायदे-नियम आपल्याच बांधवांना जगण्याचा हक्क नाकारीत आहेत. आसाममधील चाळीस लाख लोकांना त्यांच्याभोवती...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे चाणक्‍य गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून सांगितले जात होते, त्या नरेंद्र...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
जुलै 28, 2019
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृतिशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त लोकमान्यांच्या आठवणींना उजाळा... ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच....’ लोकमान्य टिळकांनी लखनौ काँग्रेसमध्ये केलेल्या या सिंहगर्जनेनंतर साऱ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडं लागलेलं होतं...
जुलै 25, 2019
कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो. तेथील घडामोडींशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा भाजपतर्फे केला जात असला तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणे शक्‍य नाही. कुमारस्वामींचे सरकार गेल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भाजपचा जो काही समाचार घ्यायचा तो घेतला...
जून 30, 2019
नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे. कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील...