एकूण 53 परिणाम
जून 06, 2019
मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.  हैदराबादहून एका विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेली...
मार्च 05, 2019
शिरपूर ः मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी, असे कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी जिवंतपणीच त्या तोडीचे सत्कार्य करून ठेवणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण तर अगदी विरळा! पण बोळे (ता. पारोळा) येथील अल्पशिक्षित मंगलबाई रतनसिंह गिरासे यांनी मात्र मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून आपली...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
डिसेंबर 28, 2018
दाभोळ - दापोली खेड मार्गावरील नारगोली येथे सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर व मॅक्सिमो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर समजल्या जाणाऱ्या दिल्लीलाही मुंबई आणि नवी मुंबईने मागे टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर झाला आहे. सातत्याने होत असलेले वातावरणातील बदल, शहरभर पसरलेला कचरा आणि उघड्यावर केल्या जाणाऱ्या प्रातर्विधीमुळे मुंबईकरांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असतानाच...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ या १६ मजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत चौघे मृत्युमुखी, तर अग्निशमन दलाच्या चार जवानांसह १७ जण जखमी झाले. जखमींवर परळ येथील केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीतील वायर डक्‍टला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे....
जुलै 14, 2018
मुंबई : रुग्णांवर प्रथमच शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिकाऊ डॉक्‍टरांतर्फे आता यंत्रावर (सिम्युलेशन लॅब) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून त्यासाठी अद्ययावत सिम्युलेशन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे.  शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात यंत्र आहेत; मात्र त्याआधारे एक...
मे 30, 2018
मुंबई - मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी सलाईनच्या बाटलीत बुरशी सापडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलाईन रुग्णाला लावण्यापूर्वीच परिचारिकेच्या ते लक्षात आल्याने रुग्णावरचा धोका टळला.  वॉर्डमध्ये रुग्णाला सलाईन लावण्यापूर्वी त्यात बुरशी असल्याचे परिचारिकेच्या लक्षात आले....
मे 07, 2018
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना लिलावती रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. परंतू जेजे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अहवालामुळे छगन भुजबळांना लिलावती ऐवजी केईएमचा मुक्काम घडल्याचे स्पष्ट  झाले आहे. सामाजिक...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 ते 300 रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या 25 ते 40 बाटल्याच आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच...
मार्च 25, 2018
रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली....
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत शिकणाऱ्या निवासी डॉक्‍टरांच्या स्टायपेंडमधून (पाठ्यवृत्ती) मोठ्या प्रमाणावर टीडीएस (उद्गम कर कपात) कापला जात असल्याची तक्रार आहे. त्याबाबतच्या तक्रारींकडे संबंधित दुर्लक्ष करीत असल्याचे या डॉक्‍टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे म्हणणे आहे....
जानेवारी 17, 2018
मुंबई - मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्‍क्‍यांनी महाग होणार आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी ही वाढ २० टक्‍क्‍यांनी करण्यात आली आहे; तर ज्येष्ठ नागरिकांना यापुढे मोफत उपचार मिळणार आहेत. पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी मिळाली आहे. महासभेच्या...
जानेवारी 15, 2018
मुंबई - निवृत्त बॅंक कर्मचारी श्रीकांत आपटे (67) आणि माध्यमांसाठी लेखन करत, आध्यात्मातील विज्ञानावर व्याख्याने देणाऱ्या नीला आपटे (60) या दांपत्याने आयुष्याची दुसरी इनिंग अवयवदान चळवळीसाठी सुरू करण्याचा निश्‍चय केला आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या या दांपत्याने या चळवळीचा पर्वत जमेल तितका...
जानेवारी 06, 2018
सावंतवाडी - त्याग हा अनेक बाबतीत दिसून येतो; मात्र आपल्या खेळासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करणारी माणसे क्वचितच असतात. तेवढ्यावरच न थांबता त्याग ज्या गोष्टीसाठी केला आहे त्यात यशाला गवसणी घालून स्वप्नांची पुर्तता करणारी माणसे आपला वेगळा ठसा समाजात उमटवितात. अशीच कहाणी आहे कोलगाव येथील स्नेहा टिळवे...