एकूण 8 परिणाम
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे....
जुलै 14, 2018
मुंबई : रुग्णांवर प्रथमच शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिकाऊ डॉक्‍टरांतर्फे आता यंत्रावर (सिम्युलेशन लॅब) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून त्यासाठी अद्ययावत सिम्युलेशन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे.  शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात यंत्र आहेत; मात्र त्याआधारे एक...
जुलै 14, 2018
मुंबई - बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला 21 आठवड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली. कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी आहे. केईएमच्या डॉक्‍टरांनी सादर केलेल्या अहवालानुसार मुलीच्या हितासाठी परवानगी देत असल्याचे न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 ते 300 रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या 25 ते 40 बाटल्याच आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच...
मार्च 26, 2018
मुंबई - केईएमनंतर आता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी रुग्णालय पातळीवर तयारी सुरू आहे. अवयव प्रत्यारोपणाबाबत झालेल्या जनजागृतीमुळे टिळक रुग्णालयात यासंबंधी शस्त्रक्रियेची माहिती घेण्यासाठी अनेक रुग्ण येतात; मात्र या ठिकाणी यकृत...
जानेवारी 17, 2018
मुंबई - मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्‍क्‍यांनी महाग होणार आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी ही वाढ २० टक्‍क्‍यांनी करण्यात आली आहे; तर ज्येष्ठ नागरिकांना यापुढे मोफत उपचार मिळणार आहेत. पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी मिळाली आहे. महासभेच्या...
डिसेंबर 17, 2017
भारतीय संस्कृतीमध्ये दानाच्या महात्म्याचे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहे. पुराणकथांमध्येही गोदान, भूदान, वस्त्रदान आदी दानांचे वर्णन आहे. आपणही रोजच्या जीवनात मंदिरापासून रस्त्यावरील भिकाऱ्याला दान करतो. दान केल्याने दात्याला समाधान मिळते; तसेच गरजवंताचीही गरज पूर्ण होते. पर्यायाने दोन्ही जीव समाधानी...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - ब्रिटनमधील ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारण्यात यावी, अशी सूचना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी नुकतीच केली आहे. पालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या सभागृहात नरवणकर यांनी याबाबत...