एकूण 52 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा मिळेल, यासाठी...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास...
डिसेंबर 20, 2018
नागपूर - शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत नागपूर विभागात पाटणसांगवी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असून, कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्‍वत शेतीविकासासाठी सज्ज होणार असल्याचे...
डिसेंबर 19, 2018
लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. केंद...
डिसेंबर 19, 2018
मुंबई : छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी करून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून दाखवू. शेती क्षेत्रात एक नवी पहाट या माध्यमातून आपण आणत आहोत. खूप मेहनतीतून हा कार्यक्रम आखला आहे. आपण यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे आणि यातून नवे मॉडेल तयार...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - शेतीपुढील आरिष्ट्ये, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास व शेतीसह गटशेतीचे तंत्र त्यातून शेती उत्पादक कंपन्यांची स्थापना यांची विषयांची माहिती तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून सोमवारी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात करण्यात आले. गटशेती चळवळ ही काळाची गरज असून...
ऑक्टोबर 01, 2018
सोलापूर- शासनाच्या गटशेतीचा फायदा घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शेतकरी गटाने 80 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आवश्‍यक रोपांची निर्मितीही त्यांनी स्वतःच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून केली. अशाप्रकारे कांद्याच्या लागवडीचा सोलापूर जिल्ह्यातील गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे -  कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळा आज (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट...
सप्टेंबर 19, 2018
जळगावः गटशेतीने शेतकऱ्यांनी उत्पादन घेतल्यास नक्‍कीच फायदा होणार असला तरी, गटशेती योजनेत असलेली किमान वीस सदस्य गरजेचे, शंभर एकर शेती असणे गरजेचे यासह विविध अटींमुळे शेतकऱ्यांना या योजनेत इच्छा असूनही सहभाग घेता येत नाही. या योजनेत किमान पाच शेतकरी सदस्य, दहा ते वीस एकर जमिनीची अट...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे...
सप्टेंबर 09, 2018
अविनाश देशमुख हे सध्या सांगोळा (जि. अकोला)  येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून दोन भावांच्या सहकार्याने त्यांनी बेलुरा खुर्द (ता. पातूर, जि. अकोला) गावातील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पारंपरिक...