एकूण 34 परिणाम
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
नोव्हेंबर 03, 2018
पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर...
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
ऑगस्ट 07, 2018
इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय दुरदृष्ट्री...
जुलै 17, 2018
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी भलतेच विषय कशाला काढता, असे म्हटल्याच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. या...
मे 24, 2018
नाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील यशानंतर व्यक्त केली. फाटाफुटीच्या राजकारणात दराडे यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. त्यामागे कारणही...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण...
मार्च 12, 2018
मुंबई : या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. आज कामकाज सुरू झाल्यावर विधानसभेचे सदस्य पतंगराव कदम यांच्यावरील शोक प्रस्ताव हेच कामकाजात होते. तरीही काही विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांनी ठोस निवेदन करावे,...
नोव्हेंबर 13, 2017
राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं एक बरं आहे, कल्याणकारी योजनेचा कोणताही लाभ सामान्यांना ते वाजवून वाजवूनच देतात. सरकारच्याच प्रचारखात्यानं सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शोधलं. ‘होय, हे माझं सरकार’ अन्‌ ‘मी लाभार्थी’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. जोरदार जाहिरात केली. आता म्हणे...
ऑक्टोबर 08, 2017
पुणे : झिरो पेंडन्सीच्या माध्यमातून पुणे महसुली विभागात गेल्या तीन महिन्यांमध्ये एक कोटी फायलींचा निपटारा करण्यात आला. आता यापुढे संपूर्ण राज्यभरात झिरो पेंडन्सी राबविणार असून, त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
सप्टेंबर 11, 2017
पुणे - देशात ५५ टक्के जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असून, एकूण उत्पन्नात १५ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. त्यामुळे शेतीतील समस्या आपल्यासमोर कायम एक आव्हान म्हणून उभ्या आहेत. देशाच्या मोठ्या बॅंकांमधील ‘एनपीए’ (अनुत्पादक कर्ज) वाढण्यासाठी छोटे कर्जदार तसेच शेतकरी जबाबदार नाहीत. काही मोठ्या...
ऑगस्ट 11, 2017
अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन रंगला सामना मुंबई - जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्‍टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीच फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. याच निमित्ताने आज महाराष्ट्र...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - विधानसभेमध्ये विरोधी पक्षांच्या वतीने गुरुवारी, 10 ऑगस्टला दहा विषयांचा अंतर्भाव असलेला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला; परंतु सरकारच्या वतीने त्यातील एक किंवा दोन विषय घेण्यात यावेत, असा नियम दर्शवत आग्रह धरला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही नियमाचा आधार घेऊन प्रस्ताव न्यून...
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिपवरून आज (बुधवार) विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की...
जुलै 17, 2017
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधानभवनात आज (सोमवार) मतदान सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व रमेश कदम यांनीही मतदान केले.  आज सकाळी दहा वाजता मतदानाला सुरवात झाली. पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 25, 2017
निलंबनाबाबत निर्णय नाही; विधान परिषदही ठप्प मुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सलग बाराव्या दिवशी विधान परिषद ठप्प झाल्याने कामकाज पत्रिकेनुसार राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत चर्चेशिवाय मंजूर झाल्याचे मानण्यात येते. विधानसभेतील विरोधी पक्षांच्या आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय झाला...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत विरोधी...
मार्च 23, 2017
आतापर्यंत 47 आमदारांवर कारवाई; यांचाही समावेश मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान गोंधळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याची बुधवारची तिसरी घटना आहे. याआधी 2001, 2011 मध्येही अशाचप्रकारे विरोधी पक्षांतील आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळच्या कारवाईत विरोधी...
मार्च 16, 2017
खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराप्रमाणे पारदर्शी कारभार करण्याची उमेदवारांना सिंहगडावर शपथ दिलेल्या भाजपचे महापालिकेत 98 नगरसेवक निवडून आले. हा शपथ सोहळा शहर भाजपसाठी एका अर्थाने भाग्यकारक ठरला असून, सिंहगडाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी नवीन कारभाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा...