एकूण 27 परिणाम
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 11, 2019
गिरीशबरोबर मी काम केलं आहे. त्याच्याबरोबर काम करताना वेगळी मजा यायची. शिवाय आम्ही दोघेही चांगले मित्र. खूप वर्षे आम्ही एकत्र होतो. जवळपास 45 ते 50 वर्षे आमची मैत्री होती. गिरीशच्या कुटुंबीयांशीही माझे चांगले संबंध होते. आमची पहिली भेट मुंबईत झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करायला सुरवात केली....
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
मे 29, 2019
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यात भाजप प्रथमच लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरा गेला आणि संमिश्र यश मिळविले. मात्र पर्रीकर यांनी गेली 25 वर्षे एकहाती राखलेला पणजी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसने या वेळी हिसकावून घेतला. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
एप्रिल 01, 2019
महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अस्वस्थ वर्तमान राज्यातील पहिल्या फेरीच्या मतदानाला जेमतेम आठवडा उरलेला असतानाही, संपुष्टात न येणे ही त्या पक्षातील सुंदोपसुंदी आणि कुरघोडीचे राजकारण यावर झगझगीत प्रकाश टाकणारीच बाब आहे. त्यामुळेच अखेर पक्षश्रेष्ठींना या गोंधळाची गंभीर दखल घेणे भाग पडले आणि शनिवारी मुंबईतील...
मार्च 14, 2019
आमच्या पार्टीचा सुजय असो! आदरणीय नमोजींच्या मार्गदर्शनाखाली औंदाच्या निवडणुकीत आमची पार्टी शतप्रतिशत सुजयी ठरेल, ह्याबद्दल आमच्या मनात संदेह उरला नाही. आपणही ठेवू नये, ही विनंती! कां की सुजयी सु-उमेदवारांनाच यंदाच्या सु-इलेक्‍शनमध्ये सुसंधी देण्याचा सुनिर्णय आमच्या सुपार्टीने घेतला आहे. त्यामुळे...
डिसेंबर 07, 2018
ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील...
नोव्हेंबर 29, 2018
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. आज शाहूंच्या वारसांना आरक्षण मिळत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी वेगळे मत व्यक्त करतात तेव्हा वाईट वाटते. राज्य मागास आयोगाने मराठा...
ऑक्टोबर 19, 2018
लाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईच्या प्रवेशद्वारांवर केलेली ती कारवाई हे अर्थातच हिमनगाचे छोटेसे टोक आहे. मुंबईच्या वेशीवर पकडण्यात आलेल्या दुधाच्या टॅंकरमधील सुमारे तीन...
ऑगस्ट 06, 2018
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ...
फेब्रुवारी 10, 2018
विज्ञानातून झालेले आकलन व आधुनिक तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेली माहिती यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या वनाच्छादित प्रदेशात बांबूपासून बासरी निर्मितीसारखे विविध कुटीरोद्योग उभारून रोजगार निर्माण करता येतील.   सा हित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशू पुच्छ विषाणहीन! साहित्याची, संगीताची, कलेची चाड नसलेला...
जानेवारी 17, 2018
आयुष्यात एखादा क्षण, एखादी घटना, एखादा अनुभव असा येतो की त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलतो. जग जिंकायला निघालेल्या सम्राट अशोकाने पाहिलेला रक्तपात, युद्धाचे भयानक परिणाम त्याला अंतर्मुख करून शांततेकडे घेऊन गेले! आफ्रिकेतील रेल्वेप्रवासातील वर्णावरून मिळालेली...
नोव्हेंबर 07, 2017
जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण वगैरे मोठमोठ्या खात्यांचा कारभार सांभाळणारे गिरीश महाजन यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या वादांची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कधी जाहीर कार्यक्रमात कमरेला रिव्हॉल्व्हर लावून भाषण, कधी अनावधानाने का होईना दाऊद इब्राहीमच्या नातलगांकडील लग्नाला हजेरी, कधी (...
सप्टेंबर 29, 2017
माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क असल्यामुळे नागरिक आणि सरकारी व अन्य संस्था यांच्यात पारदर्शकता राहावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला. मात्र, आपल्याकडे कायद्याचा गैरवापर हे व्ययच्छेदक लक्षण असल्यामुळे हा कायदाही त्यास अपवाद ठरला नाही....
ऑगस्ट 12, 2017
भारतीय लोकशाही 15 ऑगस्ट 2017 रोजी 70 वर्षे पूर्ण करेल. तिसऱ्या जगातील 125 हून अधिक देशांमध्ये हे यश मिळवणारा भारत हा एकमेव देश आहे. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत लोकशाहीची धूळधाण झालेली दिसते.आपल्या आजूबाजूला पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इराक, इराण आदी देशांत हुकूमशाहीचे भूत...
ऑगस्ट 04, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळाने इतिहास घडवला आहे! विधिमंडळाचे कामकाज चालवणे, ही जबाबदारी प्रथमत: सत्ताधाऱ्यांची असते आणि त्यानंतर विरोधकांची. सत्ताधारी पक्षाचे म्हणणे पटले नाही वा सत्ताधारी जनहिताच्या प्रश्‍नांना सातत्याने बगल देत आहेत, असे दिसू लागले आणि अन्य वैधानिक मार्ग संपुष्टात आले की अखेर...