एकूण 84 परिणाम
जुलै 21, 2019
थ्री-जी आणि फोर-जीसारख्या तंत्रज्ञानांपाठोपाठ भारतात फाइव्ह-जी तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. भारतात पुढच्या एक ते दोन वर्षांत हे तंत्रज्ञान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतात, त्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती, जगभरात या संदर्भात काय काम चालू...
जुलै 19, 2019
रत्नागिरी - देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात उभा राहिल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. सध्या दोन्ही जिल्ह्यांत नोकरी धंदा, उद्योगासाठी आशेचे किरण नाही. उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यापारी व त्यावर आधारित कामे करणारे सवर्च हवालदिल झाले आहेत...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
जुलै 06, 2019
विकासाची उत्तुंग स्वप्ने दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जमधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. स्वप्ने उत्तुंग असली, तरी तिथपर्यंत पोचण्यासाठी धावपट्टी आधी निर्वेध आणि साफसूफ करावी लागते. या अर्थसंकल्पाचे स्वरूप पाहिल्यानंतर तेच काम अजूनही करावे लागते आहे,...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : 'यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर...
जुलै 01, 2019
पुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. तिचे स्वागतच करावे लागेल. तूर्तास भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे2.8 ट्रिलियन डॉलर इतका आहे. म्हणजेच या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढील पाच वर्षे अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीचा दर किमान...
जून 28, 2019
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले. यावेळी ​राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 07, 2019
विकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 27, 2019
विशिष्ट राजकीय ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी लोकमताचा पाठिंबा मिळविणे वेगळे आणि त्या ध्येयाच्या पूर्तीचा अचूक व्यावहारिक आराखडा तयार करणे वेगळे. पहिल्यात यश मिळाले म्हणजे सगळे साध्य झाले असे नसते. खरे आव्हान असते ते दुसऱ्या गोष्टीत. या वास्तवाचा दाहक अनुभव सध्याच्या काळात कोणी घेत असेल तर तो...
मे 21, 2019
पुणे - कष्टाची तयारी असेल, तर दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते, हे राम यांच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. सकाळी सहा ते साडेआठपर्यंत सोसायट्यांमध्ये गाड्या धुऊन आणि दिवसा साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत नोकरी करून राम सुमारे ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळवत आहेत. अभियांत्रिकीच्या पदविकेला असलेला...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 14, 2019
प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते? उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या "न्याय' योजनेवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पुढे सरसावले असून "भारताला गरिबीमुक्त देशांच्या श्रेणीत आणण्याचे सामर्थ्य न्याय योजनेत आहे. माझ्या समोरच देश हे ऐतिहासिक उद्दिष्ट देश साध्य करेल,' अशा शब्दांत 86 वर्षीय डॉ....
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...