एकूण 216 परिणाम
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 23, 2019
‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प हे चीनचे भूव्यूहात्मक पाऊल आहे. त्याच्या माध्यमातून आर्थिक, राजनैतिक व लष्करी सत्तेचा विस्तार करण्याचे स्वप्न चीनला साकार करावयाचे आहे. मात्र, या प्रकल्पामुळे काही देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत, हा धोका लक्षात घ्यावा लागेल.   चीनला जागतिक व्यवस्थेची परिमाणे...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 07, 2019
विकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...
जून 06, 2019
‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट...
मे 31, 2019
जगभरात हवा प्रदूषण वाढत असून, भारतातील स्थिती अधिकच बिकट आहे. हवा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना धोरणात्मक पातळीवरच्या आणि मूलभूत असायला हव्यात. हवामान बदल आणि प्रदूषण हे एकाच समस्येचे भाग आहेत. आम आदमी पक्षाचा (आप) २०१५च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय झाला. पक्षाचे नेते अरविंद...
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणाऱ्या...
मे 27, 2019
विशिष्ट राजकीय ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी लोकमताचा पाठिंबा मिळविणे वेगळे आणि त्या ध्येयाच्या पूर्तीचा अचूक व्यावहारिक आराखडा तयार करणे वेगळे. पहिल्यात यश मिळाले म्हणजे सगळे साध्य झाले असे नसते. खरे आव्हान असते ते दुसऱ्या गोष्टीत. या वास्तवाचा दाहक अनुभव सध्याच्या काळात कोणी घेत असेल तर तो...
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 14, 2019
गुजरातमध्ये पेप्सिको कंपनीने अलीकडेच नऊ शेतकऱ्यांवर प्रत्येकी 1.05 कोटींच्या भरपाईसाठी खटला दाखल केला होता. बटाट्याची "एफसी 5' ही जात या शेतकऱ्यांनी "पेप्सिको'शी करार न करता उत्पादित केली, असा कंपनीचा आरोप होता. ही जात कमी ओलावा असलेली आहे व फक्त चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हा...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...