एकूण 56 परिणाम
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
जून 06, 2019
सध्या मनमाडमधील पाण्याच्या मुद्द्यावर जनजीवन ढवळून निघाले आहे. मनमाडला सुटलेल्या ‘पालखेड’च्या आवर्तनाचे पाणी मधेच झिरपून जाते. तहानलेल्या मनमाडकर जनतेला या प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो यापेक्षा तो लवकर मार्गी लागावा, असे स्वाभाविकपणाने वाटत असतानाच हा प्रश्‍न आता अचानक पालकमंत्री गिरीश महाजनांच्या...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 06, 2019
मांजरी : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती,...
एप्रिल 26, 2019
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निराश केले आहे. सध्या देशात केवळ महाआघाडीचे वादळ असल्याचे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केले. नाशिक मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित मोटारसायकल रॅलीनंतर त्यांनी आडगाव नाका परीसरात...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार...
एप्रिल 16, 2019
नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी...
मार्च 28, 2019
येवला : खामगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री खडी क्रशरवर सुरक्षारक्षकाची हत्या करून दहा चाकी हायवा ट्रक पळवणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांत मुद्देमालासह पकडले. पाळत ठेऊन कोपरगाव येथील सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केली असून, चोरलेला डंपर विक्री केल्याने चोरीचा शोध लावण्याचे...
मार्च 15, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे...
मार्च 15, 2019
नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे...
मार्च 06, 2019
पिंपरी : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओढून नेले. ही घटना पिंपळे गुरव परिसरात मंगळवारी (ता.५) रात्री घडली. अश्विन चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदार, अशी गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - "लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणाला काही द्यायचही नाही आणि घ्यायचही नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खोटं बोलं पण रेटून बोलं धोरण जोरात राबविले जात आहे. योजनांच्या कामांपेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला जातो आहे. गेली साडेचार वर्षांत नाराज झालेल्या जनतेला...
जानेवारी 31, 2019
कर्जत : अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे राष्ट्रवादी...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
ऑक्टोबर 29, 2018
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण...
ऑक्टोबर 29, 2018
येवला - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनर भुजबळ यांना आलेलले धमकीचे पत्र म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करवी व भुजबळाना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी अशी मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेस व राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसिलदाराकडे...
ऑक्टोबर 21, 2018
सोलापूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे कायदेशीर नोंदणी न करता डॉक्‍टर ही उपाधी लावून औषध गोळ्या, इंजेक्‍शन देणारा बोगस डॉक्‍टर गुरुदास निताई बिश्‍वास (रा. अंबल रेसिडेन्सी, गांधीनगर, गोंधळी वस्ती, सोलापूर) याच्यावर पोलिस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व सोलापूर महानगरपालिका...
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....
ऑक्टोबर 11, 2018
मनमाड - आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यावर लादलेल्या पीए संस्कृतीमुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तहसील कार्यालय सोडले तर एकही नजरेत भरणारे काम झालेले नाही. भुजबळ नावाला असलेले राज्याचे वलय नांदगाव तालुक्यात कमी होताना दिसत आहे. पीएमुळे अनेक जण दुरावत चाललेले...
ऑक्टोबर 11, 2018
'राष्ट्रवादी'च्या दोन्ही काकांचे काय? नगर - लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेचे त्रांगडे अजून काही संपत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत ही जागा "राष्ट्रवादी'च लढविणार हे ठासून सांगितले असताना, इकडे कॉंग्रेसचे नेते मात्र आघाडीकडून उमेदवारी मिळणारच आहे, अशा...