एकूण 54 परिणाम
जून 15, 2019
अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन...
जून 15, 2019
मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते...
मे 30, 2019
बांधकाम व्यावसायिकाला ‘महारेरा’चा दणका; व्याजासह रक्कम देण्याचे आदेश पुणे - सदनिका खरेदी करताना झालेल्या करारनाम्यामध्ये उल्लेख असलेली ताब्याची तारीख ग्राहकाच्या संमतीशिवाय वाढवू व बदलू शकत नाही, असे ‘महारेरा’ने (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण) दिलेल्या निकालात नमूद करण्यात आले आहे....
मे 02, 2019
येवला : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीसा देण्यात येत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक जिल्ह्यात असलेल्या भीषण दुष्काळग्रस्त...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
ऑक्टोबर 30, 2018
येवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....
सप्टेंबर 29, 2018
कऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच...
सप्टेंबर 29, 2018
पिंपरी - पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही.  शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा विडा आयुक्‍त आर. के...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
ऑगस्ट 30, 2018
रस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी...
ऑगस्ट 17, 2018
दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर...
जुलै 30, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाच वाजता होत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर पुढचे दोन दिवस ‘रात्रीस खेळ चाले’ची शक्‍यता आहे. एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या...
जुलै 14, 2018
येवला : शहरात राबवली जाणारी भुयारी गटार योजना निधीअभावी अपूर्ण अवस्थेत असून या कामाला चालना द्यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.यावेळी काम मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिले. शहराच्या भुयारी...
जुलै 01, 2018
वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयास अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार, ता. २ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग...
जून 27, 2018
जुन्नर - (दत्ता म्हसकर) नारायणगाव बायपाससह जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गाचे रखडलेले काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिला आहे.  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.60 वरील जुन्नर तालुक्यातील काम अर्धवट अवस्थेत...
जून 21, 2018
शिक्रापूर (पुणे): पावसाअभावी शिक्रापूरची पाणी पूरवठा योजना बंद होत आहे. याबाबत मागणी करुनही चासकमानचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. येत्या दोन दिवसात नदीपात्रात न सोडल्यास शिक्रापूरात रास्तारोको करण्याचा इशारा सरपंच जयश्री भुजबळ व सर्व पक्षीय पदाधिका-यांनी दिला. या आंदोलनात तळेगाव-...
जून 14, 2018
हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथे दिडशे घरे एकाच कुटूंबाच्‍या नावावर केल्‍याप्रकरणी प्रशासनाकडून संथगतीने कारवाई सुरु असल्‍याच्‍या निषेधार्थ तरुणांनी गुरुवारी (ता. १४) जिल्‍हा परिषदेत पोश्टरबाजी केली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने उपस्‍थितांचे लक्ष वेधून घेतले होते. कळमनुरी तालुक्‍यातील...