एकूण 42 परिणाम
जून 07, 2019
आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘आयुष’ मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केला. राज्य शासनानेही आयुर्वेदाचा प्रसार करण्याची घोषणा केली, परंतु ही घोषणा तर हवेत...
ऑक्टोबर 09, 2018
डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे.  चष्मा व वय यांचा सध्या फारसा संबंध राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर चष्मा लागणे...
जुलै 30, 2018
पुणे - ""श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची भगवद्‌गीता झाली. हीच संस्कृतमधील गीता संत ज्ञानेश्‍वरांनी सर्वसामान्यांना समजावी म्हणून समाजापुढे प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरीतून आणली. त्याच तोडीचे आयुर्वेदाला समाजाभिमुख करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले आहे,'' असे गौरवोद्...
जुलै 27, 2018
अग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.  गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...
जुलै 27, 2018
मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...
जुलै 06, 2018
मागच्या अंकात आपण अग्नी प्रदीप्त व कार्यक्षम राहण्यासाठी भुकेनुसार अन्न सेवन करणे सर्वश्रेष्ठ असते हे पाहिले. आता पुढची माहिती घेऊ या.  यथासात्म्यं चेष्टाभ्यवहाख्यै सेव्यानाम्‌ । कर्मामध्ये स्वतःला (स्वतःच्या प्रकृतीला) सात्म्य (अनुकूल) आहार आचरण करणे श्रेष्ठ होय.  प्रकृतीला जे मानवते, सवयीचे असते...
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
जून 15, 2018
आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...
जून 03, 2018
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला "Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात "सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...
जून 01, 2018
उन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे...
जून 01, 2018
इमर्जन्सी, सीरिअस, आय्‌.सी.यू., ॲडमिट हे शब्दच मनात भीती उत्पन्न करतात. खरे तर ही परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आयुर्वेदासारखे दुसरे उपयुक्‍त शास्त्र नाही. आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात केली तर या विषयांचा स्पर्शही होऊ नये. परंतु काही त्रास असे असतात, की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात...
मे 11, 2018
कोल्हापूर - ""होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.  कावळा नाका येथे मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटर अँड ट्रिटमेंट...
मे 11, 2018
आरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...
मे 11, 2018
आपल्या भारत देशाला अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा मिळालेला आहे, यातीलच एक म्हणजे आयुर्वेद शास्त्र. फक्‍त आरोग्याचेच नाही तर जीवन जगण्याचे परिपूर्ण शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदातील विज्ञान असे आहे की त्याला देशाची, काळाची, बदलत्या जीवनाची मर्यादा नाही. याला कारण आहे आयुर्वेदातील मूळ, भरभक्कम व...
एप्रिल 13, 2018
घराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता । ....अष्टांगसंग्रह...
मार्च 09, 2018
गर्भावस्थेपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावर अन्नाचा, हवामानाचा, समाजाचा, शिक्षणाचा, एवढेच नाही तर आपल्या वागणुकीचा व आचार-विचारांचाही कळत-नकळत संस्कार होत असतो. संस्कार हे चांगले असतातच, तसेच वाईटही असू शकतात. उदा. सुसंगतीचे संस्कार चांगले, तर कुसंगतीचे संस्कार वाईट. मात्र आयुर्वेद असो किंवा...