एकूण 35 परिणाम
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
एप्रिल 12, 2019
उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे. उत्तूरमधील (ता. आजरा...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 29, 2019
एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन...
जानेवारी 17, 2019
प्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली?  आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी सुचविल्याप्रमाणे १९८८ मध्ये पेटीवादनाच्या रसास्वादाचा कार्यक्रम सुरू केला होता. मी बाबांच्या मागे बसून साथ करायचो. दहा-बारा वर्षांपासून मी स्वतः व्यावसायिक पातळीवर...
जानेवारी 13, 2019
‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं सुरवातीला वाटण्याची...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम...
नोव्हेंबर 20, 2018
मी ४१, तर प्राची ३८ वर्षांची आहे. आम्ही दोघे सिव्हिल इंजिनियर असून, स्वतःचा व्यवयास आहे. आम्ही मार्च २०१५ मध्ये धावण्यास सुरवात केली. सोसायटीने आयोजित केलेल्या पाच किमी शर्यतीने सुरवात झाली. शर्यत पूर्ण झाली, पण दोन दिवस अंगदुखीमुळे काहीही करता आले नाही. तरुणपणी मी अनेक खेळ खेळायचो, पण नंतर नोकरी-...
ऑक्टोबर 12, 2018
वडगाव शेरी (पुणे): नारळाचे झाड बहुपयोगी असल्याने त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो; परंतु त्याही पुढे जाऊन, आपण कल्पना करणार नाही अशा दुनियेची अनोखी सफर आपणास घडते ती सुधाकर गायकवाड यांच्या घरी. पक्षी, प्राणी, मंदिर, चर्च ते अगदी आदिवासी लोकजीवन अन्‌ पारंपरिक व्यवसाय ते आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा...
ऑक्टोबर 12, 2018
वडगाव शेरी - नारळाचे झाड बहुपयोगी असल्याने त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो; परंतु त्याही पुढे जाऊन, आपण कल्पना करणार नाही अशा दुनियेची अनोखी सफर आपणास घडते ती सुधाकर गायकवाड यांच्या घरी. पक्षी, प्राणी, मंदिर, चर्च ते अगदी आदिवासी लोकजीवन अन्‌ पारंपरिक व्यवसाय ते आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा दाखवणाऱ्या...
सप्टेंबर 27, 2018
फा र्फार्पूवीची गोष्टबिष्ट नव्हे. ही दोनेक वर्षांपूर्वीचीच आहे. एक किनई दरोडेखोर होता. आता हा इसम दरवडेखोर होता की वाटमारी करणारा भुरटा ह्याबद्दल थोडेसे क्‍नफ्यूजन आहे. पण काहीही असेनाका, (हा मराठी शब्दप्रयोग आहे, जपानी नाव नव्हे!) दाखलेबाज गुन्हेगार होता इतके पुरे. आपला हा कथानायक आहे किनई, तो जो...
सप्टेंबर 22, 2018
भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’ सुपरमार्केट खरेदी करून भारतातील किराणा माल विक्रीच्या क्षेत्रातील स्पर्धेत आणखी रंगत आणली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट विकत घेतले. किराणा...
सप्टेंबर 02, 2018
केरळ म्हणजे "गॉड्‌स ओन कंट्री' अर्थात "देवभूमी.' निसर्गाचा वरदहस्त असलेल्या केरळवर यंदा मात्र आघात झाला. कमी वेळेत सर्वाधिक झालेला पाऊस, धरणांतून पाणी सोडण्याचं चुकलेलं नियोजन आणि लोकांनी अतिक्रमण करत ओरबाडलेला निसर्ग यांमुळं देखण्या केरळला महाप्रलयाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्या सौंदर्याला...
ऑगस्ट 06, 2018
मांजरी : कर्तृत्व गाजवायला ना वयाचं बंधन असते ना परिस्थितीचं. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर ते निश्चितपणे स्वतःला सिध्द करता येतच असते. हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी जर्मनी हॅम्बर्ग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन "फूल आयर्नमँन' होण्याचा मान मिळविला आहे....