एकूण 49 परिणाम
जून 07, 2019
हिवतापाला रोखेल, असे प्रभावी औषध सापडत नव्हते. नेचे हे हिवतापावर गुणकारी ठरत होते, पण त्याहून प्रभावी औषध हवे होते. आता नवे औषध सापडले आहे. हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी आता अधिक जोमाने पावले पडू शकतील. पावसाळ्यात महाराष्ट्र-गोव्यात हिवतापाची साथ येते हे लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवी. नव्याने...
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 09, 2019
नवी दिल्ली - वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज...
फेब्रुवारी 24, 2019
छत्तीसगडमधली खाद्यसंस्कृती संपन्न आहे. तसमई, खुरमी, ठेठरी, चिला असे तिथले बरेच स्थानिक पदार्थ स्वादिष्ट असतात. तसमई हा एक खिरीसारखा गोड पदार्थ असतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत हा पदार्थ खाल्ला जातो. खुरमी हासुद्धा एक गोडाचाच प्रकार आहे; पण यात गहू आणि तांदूळ याचा वापर करतात. यात गूळ, चिरौंजी,...
फेब्रुवारी 10, 2019
अनेक देशांतले राजकीय नेते व विचारवंत संशोधन व ज्ञान यांच्या आधारे, आगामी काळात काय करता येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक देशांत कधी ना कधी तरी सुवर्णयुग होतं; पण तिथल्या राजांनादेखील दोन हजार वर्षांपूर्वी दाताला कीड लागल्यावर वेदना सहन कराव्या लागत असत; म्हणून तिथले विचारवंत भविष्यात सुवर्णयुग...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट सर्वत्र सक्रिय आहेत. नागपूर रेल्वे चाइल्ड लाइनच्या सजगतेने अलीकडच्या काळात २९ बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात ३ मुलींचाही समावेश आहे. त्यांना...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे...
सप्टेंबर 20, 2018
नागपूर - ज्या वयातील मुली घरातील अंगणात खेळतात, परिसरात त्यांच्या हसण्याचा, दंगा मस्ती करण्याचा आवाज घुमतो... त्याच वयातील अनेक निराधार, अनाथ वा परिस्थितीमुळे आईवडिलांनीच दलालाला विकलेल्या अनेक कोवळ्या कळ्या जगातील एका कोपऱ्यात ‘स्टेरॉईड’ या घातक औषधांच्या भडिमारात कुसकरल्या जात आहेत. मानवी...
ऑगस्ट 18, 2018
नवी दिल्ली : पावसाच्या दमदार, परंतु विस्कळित हजेरीमुळे देशभरातील प्रमुख 91 जलाशयांमध्ये चार टक्‍क्‍यांनी पाणीसाठा वाढला असला तरी महाराष्ट्रासह त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, पश्‍चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये धरणांची पातळी समाधानकारक...
ऑगस्ट 15, 2018
लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकांचा प्रस्ताव भाजपकडून रेटण्यात येत असला, तरी ते शक्‍य नाही. खरोखरचे रचनात्मक बदल आणि राजकीय सोईचा विचार करून सुचविलेले बदल यांत मोठा फरक असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. लो कसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विषय भाजपकडून सातत्याने मांडला जातो. वारंवार...
जून 24, 2018
पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
मे 01, 2018
बांधकाम प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी; तक्रार निवारणातही अग्रेसर पुणे : बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या (रेरा) कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्राने स्थापन केलेल्या...