एकूण 14 परिणाम
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : आश्‍विन अमावास्येला महाराष्ट्राच्या सेवेला आंध्र प्रदेश, कर्नाटकची "लक्ष्मी' (केरसुणी) आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, कारटे, ऊसही आला. मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सराफी पेढ्यांवरही लक्ष्मी-कूबेर यंत्र व मूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती; परंतु नरकचतुर्दशीला अचानक आलेल्या...
जुलै 04, 2018
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सचिन तानाजी येवले या तरुण कृषी पदवीधराने केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी फळबागेसह भाजीपाला पिकांची बहुविध लागवड केली आहे. क्षारपड जमीन सेंद्रिय घटकांच्या पुनर्वापरातून सुपीक बनवली आहे. सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी कृषिदूत ब्रँड तयार केला असून,...
एप्रिल 30, 2018
बोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव...
एप्रिल 04, 2018
पोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी...
मार्च 20, 2018
सांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या पिकांसह ऊस मोठ्या...
मार्च 03, 2018
सातारा - पाच-दहा एकराचे मालक व पाण्याअभावी त्यांना हलाखीचे दिवस काढावे लागले. शेती पडून ठेवून पोटापाण्यासाठी काहींनी शहरांची वाट धरली. मिळेल ते काम करून, हातगाड्या चालवून पोटं भरली. परंतु, गेल्या दोन वर्षांत "गड्या आपुला गाव बरा म्हणत' यातील काही चाकरमानी मंडळी गावाकडे परतू लागली आहेत. कंबर कसून...
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
नोव्हेंबर 26, 2017
बबन विश्वनाथ डिघुळे हे मूळचे औरंगाबाद तालुक्‍यातील भालगावचे. शिक्षणानंतर १९८२ मध्ये त्यांना भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. तरीदेखील त्यांनी शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. दर रविवारी शेतावर जाऊन पीकनियोजन, फळझाडांची लागवड आणि आपल्या कल्पकतेनुसार भावंडे, शेतातील मजूर आणि संपर्कातील...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे - आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मी व कुबेर पूजनाकरिता विड्याची पाने, नारळ, आंब्याच्या डहाळ्या, कमळ आणि लक्ष्मीच्या प्रतिमांसह केरसुणी (लक्ष्मी), तसेच चिंच, आवळा, ऊस आणि पूजा साहित्याने सजलेल्या बाजारपेठेत बहुसंख्य पुणेकरांनी नरकचतुर्दशीला खरेदीचा मुहूर्त साधला. खरेदीदार आणि विक्रेतेही "लक्ष्मी...
ऑक्टोबर 14, 2017
आष्टा - ‘ज्यो त्यो येतुय, अमुक करतो, तमुक करतो, गटार करतो, रस्ता करतो असं म्हंतुय, मत घितुय आन्‌ परत पाच वरसं फिरकतबी न्हाय, जवळनं गेला तर बोलतबी न्हाय, मत द्याचं पण चिन्हाचा कायतरी घोळ झालाय, एकच हुतं तवा दाबाय जमायचं. आता  प्रत्येकाला येगळं येगळं हाय, त्यामुळं अवघडल्यागत हुणार’ असा सूर...
सप्टेंबर 30, 2017
नागपूर - दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूला येणारी मागणी लक्षात घेऊन नागपुरात आज मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली. मात्र झेंडूला मागणीही चांगली राहिल्यामुळे झेंडूचे दर कडाडले आहेत. नवरात्र प्रारंभानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस झेंडूचे दर सुमार होते. मात्र, बुधवारपासून 60 ते 120 रुपये प्रतिकिलो या...
जुलै 15, 2017
कोल्हापूर - हे कुटुंब तब्बल 19 जणांचे आहे. साबण, मीठ आणि चहापावडर या तीनच वस्तू ते विकत आणतात. बाकी तीळ, खसखसपासून ते वर्षभर पुरेल एवढ्या भाज्या, फळे, तेल, धान्य, डाळी ते शेतात पिकवतात. आवळ्यापासून फणसापर्यंत सगळ्या फळांचा मनसोक्‍त आस्वाद घेतात. बहुतेक पिकांसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे...